Nashik News : दूषित पाणीपुरवठा थांबवण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करा : आयुक्त कैलास जाधव

एमपीसी न्यूज : नाशिकरोड परिसरात होणारा दूषित पाणीपुरवठा बाबतच्या तक्रारी लक्षात घेऊन  आयुक्त कैलास जाधव यांनी चेहडी बंधारा येथील पंपिंग स्टेशनची पाहणी करून संबंधित विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

नाशिकरोड व परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींचे पार्श्वभूमीवर मा. आयुक्त कैलास जाधव यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यां समवेत दारणा नदीवरील चेहडी बंधारा येथील पंपिंग स्टेशनची पाहणी करून सध्या होणारा दूषित पाणीपुरवठा थांबवण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश पहाणीच्या वेळी दिले.

वालदेवी नदीचे दूषित पाणी नदीत मिसळणार नाही याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्र येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी मा.आयुक्त कैलास जाधव यांनी केली.सुरू असलेल्या कामास गती देऊन लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

या पाहणीच्या वेळी  आयुक्त कैलास जाधव यांचे समवेत शहर अभियंता संजय घुगे, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे,एस.एम.चव्हाणके, कार्यकारी अभियंता अविनाश धनाईत,विभागीय अधिकारी डॉ.दिलीप मेनकर,उपअभियंता राजेंद्र पालवे, जाधव,दप्तरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.