Akurdi News : पोलीस चौकीत पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण

सहा जणांवर गुन्हा दाखल दोघांना अटक

एमपीसी न्यूज – एका तक्रार अर्जाची चौकशी सुरू असताना सहा जणांनी मिळून पोलीस चौकीत पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 22) रात्री दहा वाजता आकुर्डी पोलीस चौकी येथे घडली.

विश्वास बाबुराव निकम (वय 64), विजय निकम (वय 60), शोभा निकम (वय 50), सागर विश्वास निकम (वय 35), सरला सपकाळे (वय 45), मिलिंद रणदिवे (वय 55, सर्व रा. निगडी प्राधिकरण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. विश्वास निकम आणि सागर निकम या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस नाईक सचिन बेबले यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री आकुर्डी पोलीस चौकी येथे एका तक्रार अर्जाची चौकशी सुरू होती. त्यावेळी आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव जमून साथरोग नियंत्रण अधिनियमाची पायमल्ली करून पोलिसांना शिवीगाळ व मारहाण केली. तसेच धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.