Bhosari : तरुणांमध्येही व्हॉलीबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी – महेश लांडगे

श्री विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठानतर्फे जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा

एमपीसी न्यूज – खेळाविषयी बोलताना मी नेहमीच आनंदित होतो. व्हॉलिबॉल अनेक ज्येष्ठ नागरिक आवडीने खेळताना बघतो. परंतु, तेवढीच या खेळाची आवड तरुणांमध्ये देखील निर्माण झाली पाहिजे. सर्वांनी सदृढ आरोग्यासाठी खेळणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष, भोसरी (Bhosari) विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी केले.

Alandi : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्ग,पालखी स्थळ पाहणी

संतनगर स्पोर्ट्स क्लब आणि श्री विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रायणीनगर-संतनगर चषक 2023 जिल्हास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा शनिवार 27 मे रोजी पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार लांडगे यांच्या हस्ते पार पडले. तर, स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ कामगार नेते सचिन लांडगे यांच्या उपस्थितीत पार पडला.

या स्पर्धेत जिल्ह्यातून 32 व्हॉलीबॉल संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत प्रथम क्रमांकांचे पारितोषिक बीडीडीएसस, पुणे या संघाने पटाकवले. तर द्वितीय क्रमांकांचे वाघेश्वर संघ (च-होली), तृतीय साकुर उंब्रज संघ (जुन्नर), चतुर्थ अतुलदादा स्पोर्ट्स क्लब (दिघी), पाचवा शिक्रापूर ए, सहावा संतनगर ए (मोशी), सातवा डोरलेवाडी संघ आणि आठवा कोपरे जुन्नर संघ यांनी पटकावला. स्पर्धेत बेस्ट नेटमनसाठी साकूर उब्रज संघाचा आल्फाज , बेस्ट शुटरसाठी शिक्रापूर संघाच्या दादा सायकर या खेळाडूंचा, तर बेस्ट शिस्तबध्द संघासाठी माऊली संघ, संत तुकारामनगर (पिंपरी) यांचा सन्मान करण्यात आला.

उद्घाटनप्रसंगी खेळाडुंशी संवाद साधताना जुन्या खेळाडुंसोबत व्हॉलिबॉल खेळल्याची आठवण त्यांनी आवर्जून सांगितली. व्हॉलिबॉल या खेळाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले होते. परंतु, आपल्या भागात या स्पर्धा मोठ्या प्रमाणात होत आहेत. येत्या काळात राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचे नियोजन करून या खेळाला महत्त्व मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्पर्धेचे संयोजक आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी खेळाडुंशी संवाद साधताना शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील असणारे आमदार महेशदादा खेळाला महत्त्व देतात. खेळाडुंच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य देतात. खेळ उत्तम आरोग्यासाठी गरजेचा आहे. त्यासाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात. जिल्हास्तरीय स्पर्धेनंतर राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा घेण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पंडित पाचचोरे, योगेश बोराटे, निलेश प्रधान, श्रीराम इचके, गणेश धुमाळ, हर्षल वाडेकर यांच्यासह संतनगर स्पोर्ट्स क्लब आणि श्री विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

विलास मडिगेरी मातीशी जोडलेले कार्यकर्ते
प्रभागातील, परिसरातील नागरिकांसाठी सातत्याने धावून जाणारे आणि त्यांच्यासाठी कार्यरत राहणारे मोजके कार्यकर्ते असतात. त्यांच्यापैकी विलासभाऊ मडिगेरी आहेत. ते मातीशी जोडलेले कार्यकर्ते असून ते सर्वांमध्ये मिसळून काम करतात. कोणतीही जबाबदारी सोपविली, तरी ती पूर्ण करण्यासाठी जिव ओतून काम करणारे म्हणून त्यांची भारतीय जनता पक्षामध्ये ओळख आहे. अनेक वर्षे ते या संपूर्ण परिसराच्या विकासकामांमध्ये योगदान देत आहेत, असे गौरवोद्गार आमदार महेश लांडगे यांनी यावेळी विलास मडिगेरी यांच्याबद्दल काढले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.