Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पाच पोलीस निरीक्षकांच्या तर एका सहाय्यक निरिक्षकाची अंतर्गत बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षकांवरील जबाबदाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आयुक्त पदाची धुरा सांभाळल्यानंतर दुसऱ्यांदा बदल्या करण्यात आल्या आहेत. चाकण पोलीस ठाणे, शिरगाव चौकी, पीसीबी / एमओबी गुन्हे शाखा, विशेष शाखा आणि वाहतूक नियोजन यात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड अंतर्गत बदल्या झालेले अधिकारी – बदलीचे ठिकाण

 # पोलीस निरीक्षक अशोक राजपूत – चाकण

# पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत – वाहतूक नियोजन विभाग

# पोलीस निरीक्षक राजेंद्र गौर – एमओबी / पीसीबी

# पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे – विशेष शाखा

# पोलीस निरीक्षक सुनील पिंजण – शिरगाव चौकी

# सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल नाईक – एमओबी/ पीसीबी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.