आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धा -इंडियाज इंटरनैशनल ग्रूव्हफेस्ट – 2019

नृत्य कलाकारांना सुवर्णसंधी 2019

एमपीसी न्यूज- भारताबरोबर जगभरातील नृत्य कलेची आवड असणाऱ्या आणि उत्तम तऱ्हेने सादरीकरण करणाऱ्या कलाकारांना सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे. आंतरराष्ट्रीय डान्स चैम्पियनशिप साठी मेघा संपत आणि पदन्यास एन्टरटेनमेंट हे नृत्यकलेत प्राविण्य असणाऱ्या कलाकारांची निवड करणार आहेत. त्यासाठी स्पर्धा आयोजित केली असून यावर्षी हि स्पर्धा थायलंड मध्ये दिनांक 2 नोव्हेंबर 2019 रोजी होणार आहे. यामध्ये नृत्यामधील विविध प्रकार सादर करण्याची संधी लाभणार आहे. त्यात शास्त्रीय नृत्यकला, लोकनृत्य कला, त्याच प्रमाणे वेस्टर्न नृत्यकला प्रकारांचा समावेश केला आहे.

मेघा संपत नृत्य दिग्दर्शिका गेली पंधरा वर्षे ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी भरतनाट्यम, आणि कथ्थक चे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्याच बरोबर वेस्टर्न नृत्यकले मध्ये त्यांनी प्राविण्य मिळविले आहे. लहानपणीच त्यांनी ठरवले होते कि आपण नृत्य दिग्दर्शिका व्हायचे आणि त्या दृष्टीने त्यांनी वाटचाल सुरु केली. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये त्यांचे कार्य मोलाचे आहे. सुरवातीच्या काळात “ बुगी-बुगी “ या शो पासून त्यांची सुरवात झाली. त्यानंतर “नच बलिये “, एका पेक्षा एक “ अश्या शो मधून त्यांनी त्यांचा ठसा सर्वत्र उमटवला. सागरिका म्युझिक च्या सागरिका ह्या त्यांच्या आदर्श आहेत. आपल्या अनुभवाचा फायदा या क्षेत्रामधील नवोदित आणि गुणी कलाकारांना मिळावा म्हणून त्यांनी पदन्यास संस्थे तर्फे IIGF ह्या व्यासपीठाचे आयोजन केले मेघा संपत ह्या इंटरनेशनल डान्स कौन्सिल CID – ( UNESCO ) युनेस्कोच्या सन्माननिय सभासद आहेत.

मेघा संपत यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेली “ IIGF “ हि स्मरणात राहणारी आंतरराष्टीय स्पर्धा असून ह्या मध्ये भारतीय आणि त्याचबरोबर पाश्चिमात्य नृत्य परंपरेचा सुरेख संगम दिमाखदारपणे दिसणार आहे. या दोन्ही प्रकारांना त्यांनी एकाच मंचावर आणले आहे. ह्या स्पर्धत कथ्थक, मोहिनी अत्तम, भरतनाट्यम, ओडिसी, आणि लोकनृत्य अशा पारंपारिक नृत्य प्रकाराप्रमाणेच हिप-हॉप, बॉलीवूड आणि लॉकिंग – पोपिंग, असे आधुनिक नृत्य प्रकारही सादर होणार आहेत. या स्पर्धे मध्ये वय वर्षे सात पासून वय वर्षे तीस पर्यंत असलेले कलाकार सहभागी होऊ शकतात, त्याच प्रमाणे “ सुपर वूमन “ ह्या गटात तीस वर्षे आणि अधिक वयाच्या महिला आपले नृत्य कौशल्य आणि अदाकारी सादर करतील. त्याच प्रमाणे एक विशेष गट हा “ नृत्य दिग्दर्शकांच्या साठी “ आहे, जर तुमचा शिष्य आय आय जी एफ मध्ये सहभागी झाला असेल तर त्याचे “ कोरिओग्राफर “ ह्या विभागात भाग घेऊन आपली कला सादर करू शकतील.

आपल्या नृत्यातील गती, नृत्याचा ध्यास आणि तुमचे पदन्यास कौशल्य तुम्ही जगाला दाखवायला उत्सुक असाल तर आय आय जी एफ हि स्पर्धा आपल्यासाठी योग्य अशी आहे. आपल्याला आंतरराष्ट्रीय कालामंचावर अदाकारी सादर करायला मिळेलच परंतु त्याच बरोबर जगभरातून आलेल्या पारंगत कलाकारांशी संवाद साधता येईल, तुम्हाला योग्य असे मार्गदर्शन, योग्य अशी दिशा मिळेल.

आपले नृत्य कौशल्य सादर करा आणि आय आय जी एफ 2019 मध्ये सहभागी व्हा. त्यासाठी आपण आपली “ नृत्य सादर केलेली – डान्स परफोर्मन्स “ ची एक व्हिदिओ क्लीप आमच्या ९१ ९९२०७२०२४४ ह्या नंबर वर whatsaap करा, सोबत सहभाग होण्यासाठी फॉर्म हि भरायचा आहे. ह्या संधीचा अवश्य फायदा घ्यावा. अधिक माहिती साठी www.internationalgroovefest.com ह्या वरती लॉग ओन करा. internationalgroofest.com

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.