New Delhi : परदेशवारीच्या विचारात आहात? हे नक्की वाचा

एमपीसी न्यूज –  ‘ओमिक्रोन’ नामक नव्या कोरोना व्हेरियंटने अवघ्या जगाला वेठीस धरले आहे. या नव्या व्हेरीयंटच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेत 31 जानेवारी 2022 पर्यंत नियमित आंतरराष्ट्रीय विमान वाहतुक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोनाचा धोका लक्षात घेता विमानसेवा पुन्हा सुरळीत करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला असून DGCA ने जारी केलेल्या पत्रकातून याबाबत आदेश दिला आहे.

इंटरनॅशनल कार्गो संचलन आणि डिजीसीद्वारे परवानगी दिलेल्या विमानसेवेवर हे नियम लागू होणार नाहीत, तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवेतील अधिकाऱ्यांना काही मार्गांसाठी परवानगी देण्याची अनुमती देण्यात आली आहे, असे DGCA च्या परिपत्रकात म्हटले आहे.

यापूर्वी 14 देश वगळता इतर देशांसाठी 15 डिसेंबर पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र नव्या व्हेरियंटचा धोका लक्षात घेता हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.