BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : डी. वाय.पाटील एज्युकेशन फेडरेशन तर्फे महिला दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- डॉ. डी. वाय.पाटील एज्युकेशन फेडरेशन तसेच डॉ .डी.वाय. पाटील स्कूल ऑफ एक्सलन्स वराळे कॅम्पसमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला संस्थेच्या विश्वस्त अनुजा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सोमाटणे फाटा येथील विघ्नहर हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. राणीशेखर बचे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी डॉ. बचे यांनी आरोग्यविषयी अतिशय उपयुक्त माहिती सांगितली.

थेरगाव येथील फिनिक्स हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. दीपाली चव्हाण यांनी स्त्रीने आपली अस्मिता जपून स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव कायम ठेवा असा संदेश दिला. पद्मा एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष जागृती माणकांत यांनी स्त्रियांनी बिनधास्त आयुष्य जगावं कोणाचाही मालकी हक्क स्वतःवर लाडू नये असा सल्ला दिला. शाळेच्या प्राचार्य डॉ .सोनल पाटील यांनी देखील मार्गदर्शन केले.

यानंतर शाळेच्या शिक्षिकांनी केलेल्या उत्स्फूर्त नृत्याने महिला दिनाची शोभा वाढवली. एम .बी.ए. च्या विद्याथिनींनी देखील सुंदर नृत्य सादर केले. केक कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

.