International Yoga Day: कोरोनाला हरविण्यासाठी योग सर्वात उपयुक्त – पंतप्रधान नरेंद्र मोदी

International Yoga Day Live: Prime Minister Narendra Modi's message on the occasion of International Yoga Day आंतरराष्ट्रीय योग दिवसांनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश

एमपीसी न्यूज – कोरोना जागतिक महामारीच्या संकटात योग हा आत्मसंरक्षणासाठी सर्वोत्तम आहे. कोरोना विषाणू श्वसनयंत्रणेवर हल्ला करतो आणि प्राणायाम श्वसनसंस्थेला बळकट करतो. प्राणायाम श्वसनाचा व्यायाम आहे. योगामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढते, शरीराची ताकद वाढते. त्यामुळे सर्वांनी योगसाधना करून आपण कोरोनावर मात करू शकतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

जागतिक योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी सकाळी राष्ट्राला संदेश दिला. त्यात ते बोलत होते.

पाहा काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी….

योगासने कोणीही करू शकतो. आपल्याकडे फक्त थोडा वेळ आणि रिकामी जागा हवी. आपल्यासमोर असलेल्या आव्हानांवर आत्मविश्वासाने वाटाघाटी करण्यासाठी योग केवळ शारीरिक शक्तीच नव्हे तर मानसिक संतुलन आणि भावनिक स्थिरता देखील देतो, असे पंतप्रधान म्हणाले.

जर आपण आपल्या आरोग्याचा आणि घराचा ताळमेळ योग्यरित्या बसवला तर तो दिवस फार दूर नाही जेव्हा जग निरोगी आणि आनंदी अशा मानवतेच्या यशस्वीतेचे साक्षीदार होईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.