Internet Browser: यूसी ब्राऊजरला सक्षम आणि सुरक्षित भारतीय पर्याय ‘टाइपइनइट ब्राऊजर’

Internet Browser: Typeinit Browser enabled and secure Indian alternative to UC Browser भारतातील सुमारे 500 दशलक्ष वापरकर्ते चीनमधील यूसी ब्राउझर वापरत होते.

एमपीसी न्यूज- चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आक्रमक भूमिका घेत भारतात मोठ्याप्रमाणात वापरले जात असलेल्या 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. भारतातील कोट्यवधी लोकांच्या स्मार्टफोनमध्ये हे अ‍ॅप्स होते. या अ‍ॅप्सचा दैनंदिन वापर मोठ्याप्रमाणात केला जात होता. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राऊजर, शेअर इट, ईएस फाईल एक्सप्लोरर, कॅम स्कॅनर सारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षा या कारणासाठी ही बंदी घातल्याचे सरकारने सांगितले आहे. बंदी घातल्यानंतर 24 तासांच्या आत प्ले स्टोअरवरून हे चिनी अ‍ॅप्लिकेशन हटवण्यात आले आहेत. अनेकजण यूसी ब्राऊजर वापरत होते. त्यांना आता अत्यंत सुरक्षित असा भारतीय पर्याय उपल्बध आहे. अस्सल भारतीय असलेले ‘टाइपइनइट ब्राऊजर’ हे सुरक्षित ब्राऊजर वापरण्याचा स्मार्टफोन धारकांना पर्याय उपलब्ध झाला आहे.

यूसी ब्राऊजरला टाइपइनइट  (Typeinit) हा पर्याय आहे. हे अ‍ॅप कोणत्याही एसडीके एकत्रिकरणापासून मुक्त आहे. दैनंदिन वापरासाठी हे अत्यंत सुरक्षित योग्य ब्राऊजर आहे.  हे वापरण्यास अत्यंत सुलभ आहे.

या ब्राऊजरचे वैशिष्ट्य म्हणजे, तुमच्या अँड्राइड स्मार्टफोनसाठी कमी मेमरी लागते. त्यामुळे तुमच्या फोनला चांगला वेगही मिळतो. अँड्राइड डिव्हाईससाठी अत्यंत उपयुक्त असे हे अ‍ॅप आहे.

भारतातील सुमारे 500 दशलक्ष वापरकर्ते चीनमधील यूसी ब्राउझर वापरत होते. यूसी ब्राउझर चीनशिवाय उर्वरित जगातील सुमारे 1.1 अब्ज लोकांनी डाऊनलोड केले आहे. याचा निम्मा व्यवसाय फक्त भारतात होत होता.

चिनी अ‍ॅप्स आपल्या डेटाचा गैरवापर करत असत. स्मार्टफोनमधील कॉन्टॅक्ट लिस्ट आणि मेसेजेसमधील वैयक्तिक माहिती चोरली जात असल्याचा संशय यापूर्वी भारत सरकारने व्यक्त केला होता. ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरत असल्याचा संशय सरकारला होता.

चीनची कंपनी असलेल्या ‘अलीबाबा’च्या यूसी ब्राउजरलाही नोटीस धाडण्यात आली होती. या ब्राउजरवर भारतीय युजर्सशी संबंधित माहिती फोडल्याचा आरोप होता. स्मार्टफोनमध्ये ‘यूसी ब्राउजर’ चालू करताच वायफायचे तपशील आणि नेटवर्क इन्फॉर्मेशन चीनच्या सर्व्हरला मिळत असल्याचाही आरोप यापूर्वी केला होता.

आता चीनची सीमेवरील दादागिरी हाणून पाडण्याची संधी भारताला मिळाली. त्याचा उपयोग करत केंद्र सरकारने यूसी ब्राऊजरसह 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली.

Website – https://typeinit.github.io/browser/

Playstore – https://play.google.com/store/apps/details?id=typeinit.web

contact- [email protected]

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.