Pimpri News: संदीप वाघेरे यांच्या वतीने इंटरव्ह्यू स्टेशन सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी येथे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात तरुणांसाठी इंटरव्ह्यू स्टेशन सुरु करण्यात आले आहे. या इंटरव्ह्यू स्टेशनचे उद्घाटन वाघेरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की, शहरातील तरुणांना सद्यस्थितीला बेरोजगारीचा सामना मोठ्या प्रमाणावर करावा लागत आहे. तरुणांना योग्यतेनुसार योग्य नोकरी मिळणे कठीण झाले आहे. यामुळे शहरातील प्रत्येक तरुणाला त्याच्या योग्यतेनुसार संधी उपलब्ध करून देण्याकरिता या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या इंटरव्ह्यू स्टेशन मध्ये हॉस्पिटल,सुरक्षा रक्षक,आय.टी.आय.हाउस कीपिंग,क्वालिटी कंट्रोल,डिप्लोमा,आय.टी.नॉन आय.टी. क्षेत्रातील सर्वच उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Chinchwad News: शिवतेजनगर येथे दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

यासाठी इंटरव्ह्यू स्टेशन मध्ये तरुणांनी आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी लक्ष्मी रेसिडेन्सी,तपोवन मंदिर रोड पिंपरीगाव येथे संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी अमित कुदळे ९६७३४९४१४९ व शुभम शिंदे ७७५८०४०९०९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वाघेरे यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते संदीप कापसे, किरण वाळूंजकर, अमोल चाफेकर, सामाजिक कार्यकर्त्या रंजना जाधव आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.