_MPC_DIR_MPU_III

Interview with ACP Shrikant Disale: जास्तीत जास्त नागरीकांनी महाट्रॅफिक ॲप डाउनलोड करावे

- सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले

एमपीसी न्यूज -( प्रमोद यादव ) : राज्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस विभागाने महाट्रॅफिक ॲप सुरू केले आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून वाहतूकीला अडथळा निर्माण करणा-या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांचे छायाचित्र अपलोड केल्यास संबंधित वाहन चालकांना दंड ठोठावला जाणार आहे. आपल्या वाहनांवर असलेले कारवाईचे चलान यावर पाहता येईल संबंधित दंडाची रक्कम या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जमा करता येणार आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी महाट्रॅफिक ॲप डाउनलोड करुन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मदत करावी असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे  सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी केले आहे. 

_MPC_DIR_MPU_IV

सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्याशी महाट्रॅफिक ॲप संबंधित माहिती घेण्यासाठी ‘एमपीसी न्यूज’ने संवाद साधला. त्यांच्याशी प्रश्र्न उत्तर स्वरुपात साधलेला संवाद खालील प्रमाणे‌.

प्रश्र्न : महाट्रॅफिक ॲप काय आहे आणि ते कसे काम करते ? 

उत्तर – महाट्रॅफिक ॲप हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी कार्यन्वीत आहे. हे ॲप नागरीक आणि महाराष्ट्र वाहतूक प्राधिकरण या दोघांच्या मदतीसाठी तयार करण्यात आले आहे. याद्वारे नागरीकांना आपले वाहनावरील चलान पाहून ते भरणे सहज सोपे होणार आहे.

प्रश्र्न : महाट्रॅफिक ॲपचे फायदे.

उत्तर – महाट्रॅफिक ॲपमध्ये सुविधांचा वापर करून, वाहन चालक आपल्या वाहनारील प्रलंबित चलान पाहू शकतो व डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड किंवा इंटरनेट बैंकिंगच्या माध्यमातून ते पैसे भरू शकतो. वाहतूक चिन्हे अभ्यासून त्याद्वारे दक्ष राहू शकतो. कायद्यानुसार एखाद्या अपराधाचे तडजोड शुल्क तपासून पाहू शकतो. वाहतूक नियमांचे उल्लंघनाबाबत व रस्त्यावरील बेकादेशीर घटनेबाबत रिपोर्ट करू शकतो.

प्रश्र्न : वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी या ॲप्लिकेशनचा कसा फायदा होईल ? 

_MPC_DIR_MPU_II

उत्तर – या ॲपमुळे कोणत्याही सुजान नागरीकासमक्ष एखादा वाहन चालक वाहतूक नियमांचे भंग करीत असले अथवा वाहतुक विषयी समस्या निर्माण करत असेल अथवा अपघात झाला असेल तर याद्वारे ती माहिती वाहतूक प्राधिकरण यांच्यापर्यंत पोहचवता येते. तात्काळ कारवाई करता येणार असल्यामुळे नक्कीच वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यास मदत होईल.

प्रश्र्न : वाहतूक पोलीसांवरील ताण यामुळे कमी होण्यास मदत होईल का ?

उत्तर – होय, नक्कीच याद्वारे वाहतूक पोलीसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

प्रश्र्न : नागरीकांसाठी या ॲपवरून वाहतूकी बाबत तक्रार देता येणार आहे, त्याबाबत काय सांगाल ? 

उत्तर – नागरीकांना या महाट्रॅफिक ॲप मधील सुविधांचा वापर करून वाहतूक नियमांचे उल्लंघन व वाहतूक समस्या विषयी तक्रार करता येते. तसेच तक्रारीची सद्यस्थिती जाणुन घेता येईल. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून वाहतूकीला अडथळा निर्माण करणा-या व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांचे छायाचित्र अपलोड केल्यास संबंधित वाहन चालकांना दंड ठोठावला जाणार आहे.

प्रश्र्न : नागरीकांना काय आवाहन कराल ? 

उत्तर – महाट्रॅफिक ॲप ॲण्ड्रॉईड गुगल प्ले स्टोअरवर तसेच आय.ओ. एस. ॲप्लीकेशन स्टोअरवर उपलब्ध आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी मोबाईलमध्ये महाट्रॅफिक ॲप डाउनलोड करावे. त्यामध्ये आपली वाहने रजिस्टर करुन वाहतूक नियमांबाबत जागरूक रहावे.

 

https://play.google.com/store/apps/details?id=com.sparken.maharashtra.mtpkotlinapp

 

 

 

 

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.