Interview with Santosh Raskar : जीवनाच्या परिकल्पना अ‍ॅनिमेशनमध्ये साकारता येऊ शकतात

एमपीसी न्यूज – आज आंतरराष्ट्रीय अ‍ॅनिमेशन दिवस त्यानिमित्ताने सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे संचालक संतोष रासकर यांची विशेष मुलाखत… एमपीसी न्यूज.इन वर
————————-

प्रश्न – इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन डे आजच का साजरा केला जातो?
उत्तर – आधुनिक काळात फ्रान्समध्ये जगातील पहिली अ‍ॅनिमेशन पडद्यावर सन 1908 साली फ्रेंच आर्टिस्ट इमील कोल यांनी पडद्यावर दिसणारं पहिलं अ‍ॅनिमेशन तयार केली होती. त्यामुळं 28 ऑक्टोबर रोजी इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन डे साजरा केला जातो. फ्रान्स येथील अ‍ॅनिमेशन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल फिल्म असोसिएशनच्या वतीने 28 ऑक्टोबर हा दिवस इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन डे म्हणून साजरा केला गेला. त्यानंतर संपूर्ण जगात हा दिवस साजरा केला जाऊ लागला.

प्रश्न – अ‍ॅनिमेशन म्हणजे नेमकं काय?
उत्तर – अ‍ॅनिमेशन म्हणजे हलणारी चित्रे, अनेक चित्रांना गती दिल्यास त्यांच्या हालचाली दिसून आभास निर्माण होतो, डोळ्याला चित्रे हालतात त्यामुळे चलतचित्र तयार होते. निर्जिव चित्रांना जीवंत करणं म्हणजे अ‍ॅनिमेशन.

प्रश्न – जगात आणि भारतामध्ये पहिल्यांदा अ‍ॅनिमेशन कुठे तयार झालं?
उत्तर – सुमारे चार हजार वर्षांपुर्वी कुंभाराच्या चाकावरील फिरणाऱ्या मातीच्या भांड्यावरील चित्रे हलताना दिसली. त्यानंतर इसवी सनपूर्व 300 मध्ये जगात पहिल्यांदा इराणमध्ये कुस्ती खेळणाऱ्या मुर्तींना हलत्या बनविण्याचा पहिला प्रयोग झाला. ते जगातलं पहिलं अ‍ॅनिमेशन मानलं जातं.

आधुनिक काळात फ्रान्समध्ये जगातील पहिली अ‍ॅनिमेशन पडद्यावर सन 1908 साली फ्रेंच आर्टिस्ट इमील कोल यांनी पडद्यावर दिसणारं पहिलं अ‍ॅनिमेशन तयार केली होती. तर भारतामधील पहिलं अ‍ॅनिमेशन पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआय) मध्ये 1972 साली तयार करण्यात आलं होतं. दूरदर्शनवर ‘एक चिडीया अनेक चिडीया’ ही पहिली अ‍ॅनिमेशन फिल्म तयार केली गेली होती.

त्यानंतर देशातील पहिली 2डी अ‍ॅनिमेशन फिल्म दशावतार ही देखील पुण्यातील फिवस स्टुडिओमध्ये तयार झाली होती. तसेच देशातील पहिली 3डी अ‍ॅनिमेशन फिल्म दिल्ली सफारी ही देखील पुण्यातच तयार झाली. त्यामुळे अ‍ॅनिमेशनची राजधानी म्हणून मुंबईची ओळख असली तरी पुणे ही जन्मभूमी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

प्रश्न – अ‍ॅनिमेशन उद्योग जगभरात का वाढला ?
उत्तर – सन 1920 साली तयार केलेली ‘टॉम एण्ड जेरी’ ही कार्टुन्स आपण आजही तितक्याच आवडीनं पाहतो. अ‍ॅनिमेशन न थकता न कंटाळा येता पुन्हा पाहता येतो. हेच अ‍ॅनिमेशनचं यश आहे. गती असलेल्या चित्रांमुळे निर्जिव वस्तू जीवंत होता. जीवनाच्या परिकल्पना अ‍ॅनिमेशनमध्ये साकारता येऊ शकते. त्यामुळे अ‍ॅनिमेशन उद्योग जगभरात विस्तारला.

प्रश्न – संगणकामुळे अ‍ॅनिमेशन क्षेत्रात नेमकी कोणती क्रांती झाली ?
उत्तर – संगणकाच्या युगामुळं अ‍ॅनिमेशन क्षेत्रात ग्राफिक्स नावाचं नवा उद्योग जन्मला. त्यामध्ये अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीतून 2डी, 3डी, गेमिंग, आर्टिफिशियल रिएल्टी, व्हर्च्युअल रिएलिटी तंत्रज्ञानाची भर त्यामध्ये पडली. मीडियामध्ये क्रांती ही अ‍ॅनिमेशनमुळं झाली.

जगातील प्रत्येक उद्योगाला अ‍ॅनिमेशनची मदत होते. प्रत्येक उद्योगांची जाहीरात, संकल्पना वास्तवामध्ये उतरविण्याची दाखविण्याची ताकद अ‍ॅनिमेशनमध्ये असते. एखाद्याला घर बांधायची असेल त्याची कल्पना आर्टिटेक्चर अ‍ॅनिमेशनद्वारे सांगू शकता.

डॉक्टरला शस्त्रक्रिया कशी करतात हे पाहण्यासाठी देखील अ‍ॅनिमेशनचा वापरा केला जाते. एखाद्या गाडीचं इंजिन नेमकं कसं काम करतं हे पाहण्याची सुविधा व्हीआर बॉक्समधून तुम्हाला अनुभवता येतं. म्हणजे उद्योग कुठलाही असू पण त्याचं चलचित्राच्या माध्यमातून निर्मितीपुर्वी अनुभव देऊ शकता. शिक्षण क्षेत्रातील बायजूस नावाचं एप देखील पुर्णतः अ‍ॅनिमेशनच्या शिवाय चालूच शकत नाही. एज्युकेशन सेक्टरमध्ये अ‍ॅनिमेशनचा प्रभावी वापर होतोय.

प्रश्न – सध्या अ‍ॅनिमेशन क्षेत्रात किती लोक काम करतात त्याची काही आकडेवारी आहे का?
उत्तर – सध्या सरकारी आकडेवारीनुसार देशात 1 लाख 85 हजार लोक फक्त अ‍ॅनिमेशन क्षेत्रात काम करत आहेत. त्यामध्ये 1 लाख 15 हजार अ‍ॅनिमेशन निर्मितीमध्ये तर 55 हजार लोक गेमिंग क्षेत्रात काम करतात.

15 हजार लोक आर्टिफिशीयल आणि व्हर्चुअल रिएल्टीमध्ये काम करत आहेत. भविष्यात 2030 पर्यंत 12 लाखाहून जास्त रोजगार निर्मिती होणार आहे. फिक्की संघटनेच्या आकडेवारीनुसार हा अंदाज आहे. बॉलीवुड आणि टॉलीवुड चित्रपटनिर्मितीमध्ये 20 पटीने जास्त रोजगार निर्मिती होणार आहे.

प्रश्न – सध्या अ‍ॅनिमेशनचे शिक्षण देणाऱ्या किती शैक्षणिक संस्था आहेत?
उत्तर – सध्या भारतात आणि महाराष्ट्रामध्ये विविध शिक्षण संस्थांमध्ये बीएस्सी अ‍ॅनिमेशन आणि बीए डिझाईन असे पदवी शिक्षण दिले जाते. परंतु तिथे फक्त सॉफ्टवेअर शिकविले जाते. मुळात अ‍ॅनिमेशन ही सरावात्मक शिक्षण पद्धतीवर आधारीत आहे. त्यामुळे केवळ प्रमाणपत्र मिळविले म्हणजे कौशल्य प्राप्त झालं असं होत नाही. त्यामुळे खासगी आणि अनुदानीत शिक्षणसंस्थांमध्ये कोर्सेस सुरू आहेत.

परंतु दर्जेदार शिक्षण न मिळाल्यामुळे गुणवत्तापूर्ण अ‍ॅनिमेशन तंत्रज्ञ तयार होऊ शकले नाही. शिक्षण पद्धतीमध्ये अनेक दोष आहेत. पाठांतरावर आधारीत शिक्षणामुळे अ‍ॅनिमेशन शिकणाऱ्यांना अडचणी येतात. मुळात सरावात्मक पद्धतीने दिर्घकाळ शिक्षण घेतले तर अ‍ॅनिमेशनमध्ये कौशल्य हस्तगत करता येऊ शकते. परदेशामध्ये पैसा, संशोधन आणि विकासावर भर दिला जातो. तसा आपल्याकडे दिला जात नाही.

प्रश्न – अ‍ॅनिमेशनमध्ये नेमक्या कोणकोणत्या प्रकारची कामे असतात?
उत्तर – अ‍ॅनिमेशन तयार करण्यासाठी स्टोरीबोर्ड तयार करणे, कंटेट तयार करणे, कॅरेक्टर डिझाईनिंग, लाईटिंग अशा प्रकारचे जवळपास ७४ प्रकारचे कौशल्याची कामे करावी लागतात. त्यामुळे अ‍ॅनिमेशन शिकणे म्हणजे केवळ सॉफ्टवेयर शिकणं नव्हे. सरावामुळे अ‍ॅनिमेशन क्षेत्रात जितकं जास्त शिकता येईल तितकं जास्त कौशल्य शिकू शकता येते.

प्रश्न – सृजन कॉलेज ऑफ डिझाईनची स्थापना कधी केली?
उत्तर – सन २००६ मध्ये सृजन कॉलेजची स्थापना केली. त्यामुळे आम्ही भारतीय शैलीचे अ‍ॅनिमेशनसाठी आम्ही संशोधन करतोय. येत्या काही दिवसांमध्ये ऐतिहासिक महापुरुषांच्या जीवनावर आधारीत जगातील पहिलं आर्टिफिशीयल रिएल्टी अ‍ॅप बुक तयार केले आहे. या प्रकल्पावर जवळपास 125 जण काम करतो आहोत. लवकरच ते आम्ही अ‍ॅप पब्लिश करतोय.

प्रश्न – भारतामध्ये अ‍ॅनिमेशन विकासासाठी नेमक्या कोणकोणत्या संधी आहेत ?
उत्तर – अ‍ॅनिमेशन विकासासाठी संशोधनाची अत्यावश्यक गरज आहे. केंद्रसरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालया अंतर्गत अ‍ॅनिमेशन आहे. त्यामुळे भविष्यात अ‍ॅनिमेशन क्षेत्र विकसीत होईल अशी अपेक्षा आहे. भारत जगातील अ‍ॅनिमेशनसाठी उत्कृष्ट बाजारपेठ आणि लीडर बनू शकेल. चीन आणि भारतामध्ये स्पर्धा आहे. परंतु कोरोनामुळं चीनमधील स्टुडीओ भारतामध्ये स्थलांतरीत होत आहेत.

त्यामुळं चीनशी स्पर्धा करण्यासाठी भारताला मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतामध्ये अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक पात्रे आहेत. त्यामुळे मूळचे भारतीय अ‍ॅनिमेशन कंटेट तयार होऊ शकते. कारण पुण्याच्या स्टुडिओत तयार झालेल्या दिल्ली सफारी आणि कृष्ण कंस अ‍ॅनिमेशन फिल्म्सना ऑस्कर नामांकन मिळाले होते. अ‍ॅनिमेशनला भाषेचं बंधन नाही, त्यामुळे भाषांतराच्या माध्यमातून अ‍ॅनिमेशन जगभरात पोहचू शकते. प्रचंड संधी आहे. संशोधन विकासाला चालना मिळाली तर मनोरंजन क्षेत्रात 36 हजार कोटींची उलाढाल आहे. त्यामुळे भविष्यात 5 लाख लोकांना नवा रोजगार मिळू शकतो.

देशातील विद्यापीठांमध्ये विहीत अभ्यासक्रम, सॉफ्टवेअर, प्रशिक्षीत अनुभवी शिक्षक मिळाल्यास जागतिक दर्जाचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण अ‍ॅनिमेशनसाठी दिले जाऊ शकते. कौशल्यावर आधारीत शिक्षण असल्यामुळे शाश्वत स्वरुपात अ‍ॅनिमेशन क्षेत्रात रोजगाराची संधी आहे.

लॉकडाऊन काळात लोकांच्या नोकऱ्या जात असताना अ‍ॅनिमेशन क्षेत्रात नवीन लोकांना नोकऱ्या मिळाल्या. त्यामुळे संगणकावर आधारीत कंटेट तयार केले जात असल्यामुळे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना वर्क फ्रॉम होमद्वारे रोजगार देऊ शकलो. देशातील आणि परदेशातील कामे खेड्यातील मुलांनी घरात बसून अ‍ॅनिमेशनची कामे करून प्रतिमहा 12 ते 15 हजार रुपये कमावतो आहे. यावरून लक्षात येईल की कौशल्य असेल तर उत्पन्न मिळू शकेल. एनिमेशन, व्हर्चुअल रिएल्टी, व्हिज्युअल इफेक्ट अशा तंत्रज्ञानामुळे शाश्वत उत्पन्न देणारे, रोजगाराची हमी देणारे क्षेत्र म्हणून अ‍ॅनिमेशनकडे पाहिलं जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.