Yoga : पाण्यात योगासने सादर करत योगाभ्यासकांनी सांगितले योगाचे महत्त्व

एमपीसी न्यूज : वृक्षासन…गरुडासन…नटराजासन…पश्चिमोत्तानासन…ताडासन (Yoga) या सोबतच एरोबिक्स आणि पाण्यातील सूर्यनमस्कार अशी विविध आसने पाण्यात करुन भारताची प्राचीन संस्कृती असलेल्या योगाचे महत्त्व सांगण्यात आले. डोळ्यांना शितल अनुभूती देणाऱ्या योगप्रकारांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. 
योगशाळा एम फिटनेस आणि योगथेरपीच्या वतीने योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अॅक्वाथॉन या अॅक्वायोगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालगंधर्व रंगमंदिरातील नांदे जलतरण तलावात योगाची प्रात्यक्षिके करण्यात आली. सोनाली मगर मोरे आणि मनाली मगर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही योगासने करण्यात आली.

सोनाली मोरे म्हणाल्या, पाण्यामध्ये करण्यात येणारा योग (Yoga) हा आपल्या शरिरासाठी अतिशय उपयुक्त आहे. अॅक्वा योगामुळे शरिराचा तोल सांभाळण्याची क्षमता वाढते. शरीराची लवचिकता वाढून पोटाचे आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात. पाण्यामध्ये शरीराचे वजन जाणवत नसल्याने व्यायाम प्रकार अधिक चांगल्या पद्धतीने करता येतात, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.