Pimpri : ‘आरटीओ’तील अनागोंदी कारभाराची चौकशी करा; युवासेनेचा आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू आहे. बॅच, बिल्ला आदींच्या वितरणात गोंधळ असल्याचा आरोप करत याप्रकरणी चौकशी करून दोषी अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी विधानसभा युवासेनेतर्फे करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार होत असल्याचे या माहिती अधिकारातील माहितीवरून समोर आले आहे. बॅच, बिल्ला मिळण्यासाठी अपुरे कागदपत्रे, बोगस रहिवाशी दाखले, ज्या दिवशी संबंधित अधिकारी रजेवर आहे. त्याच दिवशी त्यांच्या सहीने दाखले वितरित केले असल्याचे या माहितीतून उघड झाले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फिटनेस प्रमाणपत्राच्या वाहन चाचणीचे व्हिडिओ चित्रीकरण करणे बंधनकारक असताना त्याचे कुठलेही रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचेही दिसून आले आहे.

या सर्व प्रकाराची चौकशी होऊन दोषी अधिका-यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी युवासेनेच्या पिंपरी विधासभेच्या युवती सेनाधिकारी प्रतीक्षा घुले, पिंपरी विधानसभेचे विभाग संघटक नीलेश हाके, अॅड. अजित बोराडे,  सनी कड,  ओंकार जगदाळे,  राहुल राठोड यांच्या वतीने करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.