pimpri : पंतप्रधान आवास योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या पंतप्रधान आवास योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत याची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. तसेच दोषींवर फौजदारी कारवाईचीही मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ना खाउंगा ना खाने दुंगा ही घोषणा करत आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांसाठी आवास योजना जाहीर केली. पिंपरी-चिंचवड शहरात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत बोऱ्हाडेवाडी, चऱ्होली, डूडळगाव, दिघी, चिखली, वडमुखवाडी, पिंपरी, रावेत, आकुर्डीत , एकूण 9458 घरांचे प्रकल्प कार्यान्वित केला आहे.

महापालिका व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या आवास योजनेमध्ये तुलनात्मक सुमारे 135  कोटी रुपये महापालिका अधिकचा खर्च करीत आहे. शहरातील पंतप्रधान आवास योजने अंतर्गत बोऱ्हाडेवाडी, चऱ्होली, रावेत, आकुर्डी, या एकूण  4232 घरांच्या प्रकल्पांच्या निविदा प्रक्रियेत 135 कोटी रुपयांच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. महापालिका पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी संगनमत करून टक्केवारीचे राजकारण केले आहे.

करदात्या नागरिकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी महापालिकेच्या या चारही प्रकल्पांच्या निविदांना स्थगिती द्यावी. या संपूर्ण प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी करावी. या निविदेमध्ये सहभागी असणारे स्थायी समितीचे माजी सभापती, सर्व सदस्य, आयुक्त संबंधित अधिकारी यातील दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी विनंती भापकर यांनी पत्रातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.