Pimpri News : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा; भाजप महिला मोर्चाची पोलिसांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा उज्वला गावडे यांनी पोलिसांकडे केली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना निवेदन देण्यात आले आहे. सरचिटणीस सोनम मोरे, दिपाली  धनोकार, कविता कडू, भोसरी-चऱ्होली मंडळाच्या अध्यक्ष गीता महेंद्रू उपस्थित होत्या.

_MPC_DIR_MPU_II

निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील परळीतील टिक टॉक स्टार अशी ओळख असलेली पूजा चव्हाण नामक युवतीच्या आत्महत्येने संपूर्ण राज्यात एकच गदारोळ उडाल्याचे दिसून येत आहे. पूजा चव्हाण या युवतीने 7 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री हेवन पार्क सोसायटीच्या गॅलरीतून उडी मारुन आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, या आत्महत्येमागचे नेमके कारण काय आहे हे अद्यापपर्यंतच्या पोलीस तपासातून स्पष्ट झालेले नाही. यासंदर्भात अनेक राजकीय तसेच बिगरराजकीय असे अनेक निष्कर्ष काढले जात आहेत.

या निष्कर्षातून ही केवळ आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात उद्भवत आहेत. या प्रकरणास 15 ते 20 दिवस उलटून सुद्धा अद्यापही कोणताच तपास लागू शकला नाही, याची खंत वाटते. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन तिला न्याय द्यावा. संबंधित प्रकरणातील दोषी असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाने निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.