Pimpri : फेरीवाल्या मुलाच्या आत्महत्येची चौकशी करा ; टपरी, पथारी, हातगाडी पंचायतची मागणी 

Investigate the suicide of vegetable vendor's son demands tapari, pathari, hatgadi panchayat

एमपीसी न्यूज – भाजी विक्री करणाऱ्या योगेश म्हेत्रे यांनी अतिक्रमण पथकाच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी यांच्या विरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी टपरी पथरी हातगाडी पंचायत सचिव प्रल्हाद कांबळे यांनी केली आहे.

याबाबत मागणी करणारे निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे करण्यात आले आहे. या मागणीला बळीराम काकडे, रमेश शिंदे यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने मात्र अतिक्रमण कारवाईत भेदभाव केला जात असून राजकीय व्यक्तींच्या सांगण्यावरून काही व्यक्तींना सहकार्य केले जात असल्याचा आरोप टपरी पथरी हातगाडी पंचायतीच्यावतीने करण्यात आला आहे.

अतिक्रमण पथकातील संबंधित अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यामुळे योगेश म्हत्रे यांचा जीव गेला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकार्‍यांच्या  विरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी टपरी पथरी हातगाडी पंचायत सचिव प्रल्हाद कांबळे यांनी केली आहे.

शहरातील इतरही भागात बंद असलेल्या टपर्‍या तोडल्या जात असून संबंधित अधिकारी लॉकडाऊन आणि संचारबंदी कायद्याचा  दुरुपयोग करत असल्याचा आरोप बळीराम काकडे यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.