Mumbai : राज्यपालांचे शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण

एमपीसी न्यूज – भाजपने सत्ता स्थापनेच्या दाव्याला नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. शिवसेनेला उद्या संध्याकाळी सात वाजेपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा करणे आवश्यक आहे. 

सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेला, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पाठिंबा उद्या सायंकाळपर्यंत मिळविणे आवश्यक आहे. भाजपने सत्ता स्थापनेतून अंग काढून घेतल्यानंतर आता सर्वांचे लक्ष शिवसेनेच्या भूमिकेकडे लागले आहे. शिवसेना व आघाडीचे मिळून सरकार स्थापन होते का राष्ट्रपती राजवट लागू होते याकडे आता लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.