BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : हॉटेलमध्ये बोलावून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – तरुणाला हॉटेलमध्ये बोलावून मागील भांडणाच्या कारणावरून मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 13) दुपारी चारच्या सुमारास पिंपळे गुरव येथील हॉटेल मैफिल येथे घडली.

निखिल अनिल चव्हाण (वय 29, रा. नवी सांगवी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महेश माने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल आणि महेश यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले. त्या भांडणाच्या रागातून महेश याने निखिल याला पिंपळे गुरव  येथील हॉटेल मैफिल येथे बोलावले. महेश याच्या सोबत त्याचे दोन साथीदार होते. ‘मागे झालेल्या भांडणाच्या प्रकारात तू माझी माफी माग अन्यथा तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन’ अशी महेश याने निखिलला धमकी दिली. महेशच्या दोन मित्रांनी निखिलला पकडले आणि महेशने फूटपाथवर पडलेल्या सिमेंटच्या ब्लॉकने मारले. यामध्ये निखिल जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.