IPL 2020: चेन्नई सुपर किंग्जची विजयी सलामी, पाच गडी राखून मुंबई इंडियन्सवर केली मात

एमपीसी न्यूज – बहुप्रतिक्षित आयपीएल’ची सुरुवात आजपासून युएई मध्ये झाली. तेराव्या हंगामाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आबुधाबी येथील मैदानावर रंगला. अटीतटीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सवर पाच गडी आणि 4 चेंडू राखून हंगामाचा विजयी शुभारंभ केला‌. 

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सने मर्यादित वीस षटकात 162 धावापर्यंत मजल मारली. मुंबईकडून सर्वाधिक सौरव तिवारीने सर्वाधिक 42 धावा केल्या तर चेन्नई कडून लुंगी नंगीडी 38 धावा देऊन 3 बळी मिळविले.

163 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नई संघाची सुरवात फार चांगली झाली नाही. सुरुवातीच्या दोन षटकात चेन्नईचे दोन खेळाडू तंबूत परतले. अंबाती रायडू आणि फाफ डुप्लेसीने तिसऱ्या विकेटसाठी दमदार भागिदारी करत चेन्नईचा डाव सावरला.

चेन्नईकडून अंबाती रायडूने सर्वाधिक 71 धावा कुठल्या तर फाफ डुप्लेसीने नाबाद 58 धावा केल्या. शेवटच्या षटकात फाफ डुप्लेसीने ट्रेन्ट बोल्टच्या गोलंदाजी वर विजयी चौकार मारुन सामना खिशात घातला. चेन्नईने पाच गडी आणि चार चेंडू राखून मुंबई वर विजयी मिळवला.

सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्सचे पारडे जड वाटत असतानाच अंबाती रायडू आणि फाफ डुप्लेसीच्या जीवावर चेन्नईने सामना जिंकून हंगामाचा विजयी शुभारंभ केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.