IPL 2020 : दिल्लीची बंगळुरूवर सहा गडी राखून मात, दोघांनाही प्ले-ऑफचं तिकीट

एमपीसी न्यूज – दिल्लीच्या संघाने बंगळुरूवर सहा गडी राखून विजय मिळवला. बंगळुरूने दिलेल्या 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी अजिंक्य रहाणे (60) आणि शिखर धवन (54) यांच्या अप्रतिम खेळींच्या जोरावर दिल्लीच्या संघाने विजय मिळवत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. तसेच, चांगल्या नेट रनरेटमुळे बंगळुरूला देखील प्ले-ऑफ मध्ये स्थान मिळाले आहे.

दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. पृथ्वी शॉ 2 चौकार लगावत 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांनी अनुभव पणाला लावत संघाला मजबूत भागीदारी करून दिली.

शिखर धवन दमदार अर्धशतक केल्यावर माघारी परतला. त्याने 54 चेंडूत 6 चौकारांसह 54 धावा केल्या. तो बाद झाल्यावर अजिंक्य रहाणे याने संयमी खेळी करत हंगामातील पहिले अर्धशतक लगावले. त्याने 46 चेंडूत 60 धावा केल्या.

अखेरीस ऋषभ पंत (8) आणि मार्कस स्टॉयनीस (10) या दोघांनी नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला. शहाबाजने 2 गडी तर सुंदर, सिराजने 1-1 बळी टिपला.

_MPC_DIR_MPU_II

त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूचा सलामीवीर जोशुआ फिलीप (12) स्वस्तात बाद झाला. विराटही 24 चेंडूत 29 धावा करून माघारी परतला. त्यानंतर पडीकलने डीव्हिलियर्सच्या साथीने भागीदारी करत डावाला आकार दिला. पडीकलने 41 चेंडूत 5 षटकारांसह 50 धावा केल्या.

डीव्हिलियर्सने फटकेबाजी केली, पण मोक्याच्या क्षणी तो 21 चेंडूत 2 षटकारांसह 35 धावा करून बाद झाला. त्यामुळे संघाला 152 पर्यंतच मजल मारता आली. दिल्लीकडून एनरिक नॉर्येने 3, कगिसो रबाडाने 2 तर अश्विनने 1 बळी टिपला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1