IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाईट राईडर्सवर 18 धावांनी विजय

एमपीसी न्यूज – आयपीएल 2020 स्पर्धेत शारजा येथे शेवटच्या षटकापर्यंत उत्कंठावर्धक झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट राईडर्सवर 18 धावांनी विजय मिळवला.

 दिल्ली कॅपिटलने उभारलेल्या सर्वाधिक 228 धावांचा पाठलाग करताना कोलकत्ता नाईट रायडर्स चे प्रयत्न तोकडे पडले. मर्यादित 20 षटकात कोलकात्ता 8 बाद 210 धावांपर्यंत मजल मारु शकली. कोलकत्ता कडून नितीश राना याने अर्धशतकी पारी केली तर इयन मॉर्गन ने 44 धावा केल्या पण कोलकत्ता 18 धावांनी विजयापासून दूर राहिली.

कोलकत्ताची सुरवात फारशी चांगली झाली नाही. सुनील नरेन लवकर बाद झाल्यानंतर शुभम गिल आणि आंद्रे रसेल यांनी पारी सांभाळली‌. शुभम गिल बाद झाल्यावर नितीश राना याने अर्धशतकी पारी खेळत कोलकत्ताची बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्याने 35 चेंडूत 58 धावा केल्या.

त्यानंतर इयन मॉर्गन ने 44 धावा केल्या पण कोलकत्ता 18 धावांनी विजयापासून दूर राहिली. दिल्लीकडून नाॅर्ट्जे याने तीन बळी घेतले तर हर्षल पटेल याने दोन व मिश्रा, स्टाॅयनिस व रबाडा यांनी प्रत्येकी एक एक बळी घेतला.

त्याआधी कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तो निर्णय प्रचंड फसला. सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दोघांनी अर्धशतकी सलामी दिली. चांगली सुरूवात मिळाल्यानंतर धवन 26 (16) धावांवर बाद झाला.

पण पृथ्वी शॉने कर्णधार श्रेयस अय्यरच्या साथीने फटकेबाजी सुरूच ठेवली. पृथ्वीने आपले अर्धशतक झळकावले, पण मोठा फटका खेळताना तो 66(41) धावांवर बाद झाला. त्याने 4 चौकार आणि 4 षटकार लगावले. पृथ्वीचे हे आयपीएलमधील सहावे अर्धशतक ठरले. पाच अर्धशतके नावावर असलेल्या ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडत पृथ्वीने ही कामगिरी केली.

पृथ्वी बाद झाल्यावर ऋषभ पंतनेही तुफान फटकेबाजी केली. तो पाच चौकार आणि एका षटकारासह 38(17) धावांवर बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरने मात्र धडाकेबाज खेळी केली. त्याने फक्त 38 चेंडूत नाबाद 88 धावा ठोकल्या. त्याने 7 चौकार आणि 6 षटकार लगावले. या फटकेबाजी जोरावर दिल्लीने 20 षटकात 4 बाद 228 धावा केल्या. रसेलने सर्वाधिक 2 बळी घेतले

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.