IPL 2020 FINAL : मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा जिंकले ‘आयपीएल’चे विजेतेपद 

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – कर्णधार रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सनने दिल्ली कॅपिटल्सला नमवत आयपीएल पाचव्यांदा जेतेपद मिळवले. आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या विजेतेपदासाठी झालेल्या मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने पाच गडी राखून दिल्लीवर विजय मिळवला आहे. यासह मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा आयपीएलचा किताब आपल्या नावे केला आहे. 

दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक या अनुभवी जोडीने पॉवरप्लेच्या ओव्हर्समध्ये दिल्लीच्या बॉलिंगवर वादळी आक्रमण केलं.

स्टॉइनसच्या बॉलिंगवर क्विंटन आऊट झाला. त्याने 12 बॉलमध्ये 20 धावांची खेळी केली. रोहितने सूर्यकुमारच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. त्यानंतर सूर्यकुमार 19 धावा काढून धावबाद झाला.

संपूर्णपणे फिट नसतानाही रोहितने चौकार षटकार आणि एकेरी दुहेरी यांची सुरेख सांगड घालत धावा केल्या. सूर्यकुमार परतल्यानंतर इशानने रोहितला साथ दिली. इशानने नाबाद 33 धावांची खेळी केली.

अँनर्रिक नॉर्कियाच्या बॉलिंगवर बदली खेळाडू ललित यादवने अफलातून कॅच घेत रोहितची खेळी संपुष्टात आणली. रोहितने 51 चेंडूत 5 चौकार आणि 4षटकारांसह 68 रन्सची खेळी केली. दिल्ली कडून नाॅर्टजे याने दोन तर, रबाडा, स्टाॅयनिस यांनी 1-1 बळी घेतला.

दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना सलामीच्या फळीतील फलंदाजांनी घोर निराशा केल्यानंतर मधल्या फळीत कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी केलेल्या महत्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबईविरुद्ध अंतिम सामन्यात 156 धावांपर्यंत मजल मारली.

दिल्लीची 3 बाद 22 अशी परिस्थिती असताना पंत आणि अय्यरने चौथ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. ऋषभ पंत माघारी परतल्यानंतरही श्रेयस अय्यरने शेवटपर्यंत मैदानावर तग धरत अर्धशतक झळकावलं.

श्रेयसने 50 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 65 धावा केल्या. तर ऋषभ पंतने 38 चेंडूत महत्त्वपूर्ण 56 धावा केल्या. मुंबईच्या ट्रेंट बोल्टने 3, कुल्टर-नाईलने 2 तर जयंत यादवने 1 बळी घेतला.

मुंबईचे आयपीएल स्पर्धेचं पाचवं जेतेपद आहे. मुंबई इंडियन्सने याधी 2013, 2015, 2017, 2019 अशा चारवेळा जेतेपदांवर नाव कोरलं आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.