IPL 2020 : हैदराबादचा पहिला विजय, दिल्ली कॅपिटल्सवर 15 धावांनी मात

एमपीसी न्यूज – सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सवर 15 धावांनी मात करत आयपीएलच्या तेराव्या हंगामातील आपल्या पहिल्या वहिल्या विजयाची नोंद केली. हैदराबादने दिलेल्या 162 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटलचा डाव 147 धावांवर आटोपला.

दिल्ली कॅपिटल्सकडून कोणीही मोठी धावसंख्या उभारू शकले नाही. शिखर धवन (34( ऋषभ पंत ( 28) आणि शिमरॉन हेटमायर (21) यांच्या व्यतिरिक्त कोणीही 20 हुन अधिक धावा काढू शकले नाहीत. याविरुद्ध हैदराबाद नाही उत्कृष्ट गोलंदाजी करत दिल्ली कॅपिटल चांगलेच धारेवर धरले आणि 165 धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स डाव 147 धावांवर आटोपला. हैदराबाद कडून राशिद खान यांनी सर्वाधिक तीन गडी बाद केले. तर भुवनेश्वर कुमार 2, आणि खलील अहमद व नटराजन यांनी 1-1 गडी बाद केला.

त्यापूर्वी दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या संघाने 20 षटकात 4 बाद 162 धावा केल्या. जॉनी बेअरस्टोचे अर्धशतक आणि त्याला वॉर्नर, विल्यमसन यांच्या फटकेबाजीची मिळालेली साथ यांच्या जोरावर हैदराबादच्या संघाने 160 पार मजल मारली.

कर्णधार म्हणून आपला पन्नासवा सामना खेळणाऱ्या वॉर्नरला अर्धशतकाने मात्र हुलकावणी दिली. त्याने 33 चेंडूत 45 धावा केल्या. बेअरस्टोने 48 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार लगावत 53 धावा केल्या. विल्यमसनने देखील चांगली फलंदाजी केली. त्याने 26 चेंडूत 5 चौकारांसह 41 धावा केल्या. तर आपला पहिला आयपीएलचा सामना खेळणारा अब्दुल समाद याने 1 चौकार आणि 1 षटकार ठोकत 7 चेंडूत नाबाद 12 धावा केल्या. दिल्लीच्या रबाडा आणि मिश्रा यांनी 2-2 गडी बाद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.