IPL 2021 : आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, मुंबई आणि बंगळुरू संघात रंगणार पहिला सामना

एमपीसी न्यूज – क्रिकेटरसिक आतुरतेनं वाट पाहत असलेल्या आयपीएल 2021 चं अखेर आज वेळापत्रक जाहीर झालं आहे. दोन वर्षानंतर आयपीएल भारतात परतले असून नऊ एप्रिल रोजी चेन्नईत हंगामाचा पहिला सामना खेळला जाईल. गतविजेत्या मुंबई आणि बंगळुरु संघात रंगणार पहिला सामना रंगणार आहे.

देशातील अहमदाबाद, बेंगलुरु, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे हे सामने होणार आहेत. प्ले ऑफ आणि 30 मे रोजी होणारा अंतिमा सामना अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. यंदाच्या आयपीएलचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोणताही संघ त्यांच्या घरच्या मैदानावर सामना खेळणार नाही. लीगच्या टप्प्यात सर्व संघ 6 पैकी 4 ठिकाणी खेळतील.

प्रत्येक संघ लीगच्या टप्प्यात चार ठिकाणी सामना खेळेल. 56 लीग सामन्यांपैकी चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बेंगलुरु येथे प्रत्येकी 10 सामने तर अहमदाबाद व दिल्ली येथे प्रत्येकी 8 सामने खेळले जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.