IPL 2020 : कोलकाताचा साठ धावांनी विजय, राजस्थानचं आव्हान संपुष्टात

एमपीसी न्यूज –  आयपीएल स्पर्धेत आव्हान टिकवण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात राजस्थानला कोलकाता नाईट रायडर्सकडून 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानचा संघ 131 धावांपर्यंतच मजल मारु शकला. या पराभवासोबत राजस्थानचं आयपीएलच्या तेराव्या हंगामातलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

कोलकाताने दिलेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानची पहिल्यापासून खराब सुरुवात झाली. पॅट कमिन्स आणि इतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे राजस्थानच्या सर्व फलंदाजांनी नांगी टाकली.

मधल्या फळीत जोस बटलर आणि राहुल तेवतिया यांनी काही क्षणांसाठी भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यांचे प्रयत्नही अपुरे पडले. राजस्थानकडून बटलरने 35 तर तेवतियाने 31 धावांची खेळी केली.

कोलकाताकडून पॅट कमिन्सने 4, वरुण चक्रवर्ती आणि शिवम मवीने प्रत्येकी 2*2 तर कमलेश नागरकोटी 1 बळी घेतला.

सुरुवातीला नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम फलंदाजीचा घेतला. जोफ्रा आर्चरने नितीश राणाला पहिल्याच षटकात माघारी धाडलं. त्यानंतर शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी या फलंदाजांनी संयमी खेळ करत कोलकाता नाईट रायडर्सचा डाव सावरला.

राजस्थानच्या गोलंदाजांचा सामना करत दोन्ही फलंदाजांनी धावांचा ओघ कायम ठेवला. दुसऱ्या विकेटसाठी 72 धावा जोडल्यानंतर गिल राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर बाद झाला, त्याने 36 धावा केल्या. सुनिल नारायण भोपळाही न फोडता माघारी परतला. राहुल त्रिपाठीही ठराविक अंतराने माघारी परतला.‌

अडचणीत सापडलेल्या कोलकाता संघाला कर्णधार मॉर्गन आणि आंद्रे रसेल यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे मोठी धावसंख्या उभारता आली. स्टोक्सने 11 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकार लगावत 25 धावा केल्या.

कर्णधार मॉर्गनने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत महत्वाच्या सामन्यांत संघाला भक्कम धावसंख्या उभारुन दिली. त्याने 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 68 नाबाद धावांची खेळी केली.

राजस्थानकडून राहुल तेवतियाने 3, कार्तिक त्यागीने 2 तर जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.