IPL 2020 : मनदिप सिंग आणि ख्रिस गेलचं दमदार अर्धशतक, पंजाबचा कोलकतावर 8 गडी राखून विजय

एमपीसी न्यूज – मनदिप सिंग आणि ख्रिस गेलनं केलेल्या दमदार अर्धशतकामुळे पंजाबने कोलकतावर 8 गडी राखून विजय मिळवला. पंजाबला विजयासाठी तीन धावांची गरज‌ असताना केल आऊट झाला. त्यानंतर आलेल्या पूरणने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

कोलकताने दिलेल्या 150 धावसंख्येचा पाठलाग करताना के एल राहुल 28 धावा करून बाद‌ झाला. त्यानंतर मनदिप सिंग आणि ख्रिस गेलनं केलेल्या दमदार अर्धशतकामुळे पंजाबने कोलकतावर 8 गडी राखून विजय मिळवला. मनदिप सिंगने नाबाद 66 धावा केल्या तर, ख्रिस गेलनं 51 धावा केल्या. पंजाबला विजयासाठी तीन धावांची गरज‌ असताना गेल आऊट झाला. त्यानंतर आलेल्या पूरणने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

पंजाबने‌ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाताच्या डावाची सुरूवात अतिशय खराब झाली. नितीश राणा पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. त्यानंतर शमीने दुसऱ्याच षटकात राहुल त्रिपाठी (7) आणि दिनेश कार्तिकला (0) माघारी धाडलं. पण शुबमन गिल आणि कर्णधार मॉर्गन यांनी पलटवार करत दमदार 80 धावांची भागीदारी केली. मॉर्गनने 25 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 40 धावा केल्या.

मॉर्गन बाद झाल्यावर पुन्हा कोलकाताच्या डावाला गळती लागली. पण शुबमन गिलने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 45 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार खेचत 57 धावा केल्या. शेवटच्या काही षटकांमध्ये 13 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 21 धावा केल्या. त्यामुळे कोलकाताला 149 धावांपर्यंत मजल मारता आली. मोहम्मद शमीने 3, जॉर्डन, बिश्नोईने 2-2 तर मुरुगन अश्विन, मॅक्सवेलने प्रत्येकी 1 बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.