Mumbai Indians: पीपीई किट घालून मुंबई इंडियन्सची टीम ‘यूएई’ला रवाना

IPL 2020: Mumbai Indians team leaves for UAE wearing PPE kit आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या सामन्याने होणार आहे.

एमपीसी न्यूज – आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात येत्या 19 सप्टेंबरपासून ‘यूएई’ मध्ये होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध संघ आता यूएईला रवाना होत आहेत. मुंबई इंडियन्सची टीम पीपीई किट घालून ‘यूएई’ला रवाना झाली आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने खेळाडूंचे पीपीई किट घातलेले फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत.

आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या सामन्याने होणार आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पीपीई किट घालून आपल्या कुटुंबासह मुंबई विमानतळावर दाखल झालेले फोटो मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हॅन्डलवर पोस्ट केले आहेत.

मुंबई इंडियन्सचा क्रिकेटर सूर्यकुमार यादवने आपल्या ट्विटर ‘सीक्रेट मिशनवर, अबू धाबी’ असे लिहून आपला फोटो पोस्ट केला आहे.

हार्दिक पंड्या आणि कुणाल पंड्या आणि देखील आपला पीपीई किट घातलेला एकत्र फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

मुंबई इंडियन्सने आजपर्यंत सर्वांत जास्त चार वेळा आयपीएल टायटल जिंकले आहे. यावेळी सुद्धा रोहित शर्माच्या कर्णधार पदाच्या खाली संघ उत्कृष्ट कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.

मुंबई इंडियन्सच्या अगोदर राजस्थान, पंजाब आणि कोलकाता हे संघ ‘यूएई’ला रवाना झाले आहेत. आज (दि.21) बंगळुरु आणि चेन्नई सुपरकिंग्स या टीम सुद्धा ‘युएई’ला रवाना होणार आहेत. या सर्व खेळाडूंना सहा दिवसांसाठी यूएईमध्ये क्वारंटाइन राहावे लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.