IPL 2020 : मुंबई इंडियन्सचा पहिला विजय, कोलकाता नाईट राईडर्सवर 49 धावांनी मात

एमपीसी न्यूज – मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या सामन्यात मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 195 धावा ठोकल्या. 195 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा डाव 9 बाद 146 धावांत आटोपला. मुंबई इंडियन्सने कोलकत्ता वर 49 धावांनी मात केली. यासह मुंबई संघाने आयपीएल हंगामातील पहिला विजय नोंदविला आहे. 

कोलकाता संघांची सुरुवात काही चांगली झाली नाही. 14 धावांवर कोलकाता संघाची गिलच्या रुपानं पहिली विकेट पडली तर संघाच्या 25 धावांवर सुनील नारायण आऊट झाला.

त्यानंतर आलेल्या कार्तिकने डाव सावरायचा प्रयत्न केला पण तोही 30 धावा काढून बाद झाला. त्यानंतर कोलकत्ता संघाची पडझड सुरू झाली आणि संघाचा डाव 146 धावांत आटोपला. मुंबई कडून. बोल्ट, बुमराह, पैटिन्सन आणि चहर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर केराॅन पोलार्डने 1 बळी घेतला.

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या सामन्यात कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 195 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 6 षटकार लगावत 80 धावांची तुफानी खेळी केली.

सूर्यकुमार यादवनेही फटकेबाजी केली, पण त्याला अर्धशतक करता आले नाही. त्यानं 28 चेंडूत 47 धावा केल्या. मुंबईने 20 षटकात पाच गड्यांच्या बदल्यात 195 धावा उभारल्या. कोलकात्ता कडून मावी ने 2 तर सुनिल नारायण व आंद्रे रसेल यांनी 1-1 विकेट घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.