IPL 2020 : आयपीएल आयोजनचा मार्ग  मोकळा ; बीसीसीआयचे ‘युएई’ला अधिकृत पत्र

Pave way for IPL; BCCI's official letter to UAE : 'बीसीसीआय'ने 'युएई'ला याबाबत अधिकृत पत्र पाठवले आहे.

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – ‘आयपीएल 2020’च्या आयोजनचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.  ‘बीसीसीआय’ने ‘युएई’ला याबाबत अधिकृत पत्र पाठवले आहे. म्हणजे आता आयपीएलचे आयोजन होणारच असल्याची पुष्ठी झाली आहे. 

काही दिवसांपूर्वी आयपीएलचे अध्यक्ष ब्रजेश पटेल यांनीही आयपीएल 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये खेळला जाणार असल्याची माहिती दिली होती.

‘युएई’ क्रिकेट बोर्ड ने आपल्याला बीसीसीआयचे आयपीएल आयोजनाबाबत एक पत्र मिळाले असल्याचे ट्विटरद्वारे सांगितले आहे.

आयपीएलसाठी आता फक्त भारत सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. त्यानंतर, आयपीएल 2020 चे वेळापत्रकही जाहीर केले जाईल.

कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आला होता. परंतु, आता टी -20 विश्वचषक पुढे ढकलण्यात आल्याने बीसीसीआयने आयपीएल 2020 च्या आयोजनाची पुष्टी केली आहे.

युएई व्यतिरिक्त श्रीलंकेच्या बोर्डाने आयपीएलचे आयोजन करण्यासाठी बीसीसीआयकडे संपर्क साधला होता. परंतु, अखेर बीसीसीआयने युएईला पसंती दिली आहे.

यापूर्वी 2014 मध्ये काही आयपीएल सामने युएईमध्ये खेळवण्यात आले होते. प्रेक्षका शिवाय होणार्या या आयपीएलचे आयोजन युएई कशा पद्धतीने करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.