IPL 2020 : राजस्थानचा चेन्नईवर सात गडी राखून विजय

एमपीसी न्यूज – राजस्थान रॉयल्सने चेन्नई वर सात गडी राखून विजय मिळवला आहे. चेन्नई ने विजयासाठी दिलेल्या 126 धावांचा पाठलाग करताना राजस्थान कडून जोस बटलर आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी दमदार खेळी करत चेन्नईवर सात गडी राखून विजय मिळवला. जोस बटलरने 48 चेंडूत 70 धावा केल्या तर, कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांने 26 धावा केल्या.
राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही तिसऱ्या षटकात बेन स्टोक्स 19 धावा करून बाद झाला तर लगेचच चौथ्या षटकात चार धावा करून राॅबीन उथाप्पा बाद झाला. संजू सॅमसन हा शुन्यावर बाद झाल्यानंतर जोस बटलर आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी दमदार खेळी केली.
जोस बटलरने 48 चेंडूत 70 धावा केल्या तर, कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांने 26 धावा केल्या. चेन्नई कडून दिपक चहर याने 2 तर हेजलवूड ने एक गडी बाद केला.
Match 37. It's all over! Rajasthan Royals won by 7 wickets https://t.co/St5iaCvwkh #CSKvRR #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 19, 2020
सुरवातीला नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर फाफ डु प्लेसिस फक्त दहा काढून बाद झाला. शेन वॉटसनही 8 धावा काढून माघारी परतला. सॅम करनने एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 22 धावा केल्यावर तो झेलबाद झाला. रायडूही 13 धावा काढून स्वस्तात बाद झाला.
त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रविंद्र जाडेजा यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला शंभरी पार करून दिली. आठराव्या षटकात धोनी 28 धावांवर धावचीत झाला. अखेरीस रविंद्र जाडेजाने नाबाद 35 आणि केदार जाधव 4 केल्या, या दोघांनी संघाला 20 षटकांत 5 बाद 125 धावांपर्यंत मजल मारून दिली.
राजस्थान कडून श्रेयस गोपालने 14 धावांत 1 बळी, राहुल तेवातियाने 18 धावांत 1 बळी तर जोफ्रा आर्चरने 20 धावांत 1 बळी घेतला.