IPL 2020 : पाच गडी राखून राजस्थान रॉयल्स विजयी 

एमपीसी न्यूज – हैदराबादने उभारलेल्या 158 धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने हैदराबादवर पाच गडी राखून विजय मिळवला आहे. रियान पराग (42) आणि राहुल तेवतिया (45) यांच्या धडाकेबाज नाबाद खेळीमुळे राजस्थानला हा विजय मिळवणे सोपे झाले. 

159 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला राजस्थान रॉयल ची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्या षटकात बेन स्टोक स्वस्तात माघारी परतला, त्यानंतर कर्णधार स्टिव्ह स्मिथ पण पाच धावांवर बाद झाला.

त्यानंतर जोस बटलर व संजू सॅमसंग यांनी पारी संभाळण्याचा प्रयत्न केला. बटलर पाचव्या शतकात 16 धावांवर बाद झाला त्यानंतर संजू सॅमसन आणि उथाप्पा यांनी डाव पुढे नेला.

संजू सॅमसन 26 धावा तर उथाप्पा 18 धावा काढून बाद झाला. त्यानंतर रियान पराग याने केलेल्या नाबाद 42 आणि राहुल तेवतिया याने केलेल्या नाबाद 45 धावांच्या जीवावर राजस्थानला विजय मिळवणे सोपे झाले. हैदराबाद कडून राशिद खान आणि खालील अहमद या दोघांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीरकारली. हैदराबादच्या संघाकडून जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर ही तडाखेबाज जोडी सलामीसाठी आली. पण राजस्थानचे जोफ्रा आर्चर आणि श्रेयस गोपाल या दोघांनी डावाच्या सुरूवातीला 4 षटकांत बेअरस्टो-वॉर्नरला जोडीला केवळ 13 धावाच करून दिल्या.

बेअरस्टो 16 धावा काढून झेलबाद झाला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडे या जोडीने सामना पुढे नेला वॉर्नरने 38 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांसह 48 धावा केल्या. तर मनिष पांडेने 44 चेंडूत 2 चौकार व 3 षटकारांच्या सहाय्याने 54 धावा केल्या.

शेवटच्या काही षटकांमध्ये केन विल्यमसनने 12 चेंडूत 2 षटकार खेचत नाबाद 22 धावा केल्या आणि संघाला 158 पर्यंत पोहोचवले.

राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने कार्तिक त्यागी आणि उनाटकट यांनी 1-1-1 गडी बाद केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.