IPL 2020 News : आयपीएल स्पॉन्सरशीपसाठी रामदेव बाबांची उडी, ‘पतंजली’ लावू शकते बोली

बहुप्रतिक्षित 'इंडियन प्रीमिअर लीग'ला 19 सप्टेंबरपासून 'युएई'मध्ये सुरवात होत आहे. : Ramdev Baba's jump for IPL sponsorship, 'Patanjali' can bid

एमपीसी न्यूज – बहुप्रतिक्षित ‘इंडियन प्रीमिअर लीग’ला 19 सप्टेंबरपासून ‘युएई’मध्ये सुरवात होत आहे. चिनी कंपनी ‘विवो’ने आयपीएल स्पॉन्सरशीप रद्द केली असून बीसीसीआय समोर नवा स्पॉन्सर शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे. 

आयपीएल स्पॉन्सरशीपसाठी बायजु, रिलायन्य जिओ, ऍमेझॉन आणि टाटा ग्रुप यांच्यात चुरस असल्याची माहिती समोर आली होती.

आता या स्पर्धैत रामदेव बाबांनी उडी घेतली असून ‘पतंजली’ आयपीएल स्पॉन्सरशीपसाठी बोली  लावू शकते, अशी माहिती सुत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आयपीएल मुख्य प्रायोजकसाठी बोली लावू शकतात.

इकनॉमिक्स टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, पतंजलीचे प्रवक्ते एस.  के. तिजरवाला यांनी सांगितले की, ‘आम्हाला पतंजली हा जागतिक ब्रँड बनवायचा आहे आणि म्हणूनच आम्ही आयपीएल प्रायोजकत्वाबद्दल विचार करीत आहोत’.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बीसीसीआयनं ‘विवो’कडून प्रायोजकत्व काढून घेतल्याची घोषणा केली होती. बीसीसीआयने गेल्या आठवड्यात विवोबरोबरचा करार संपविण्याचा निर्णय घेतला.

2017 मध्ये, विवो इंडियाने 2199 कोटी रुपयांमध्ये आयपीएल टायटल प्रायोजकत्व अधिकार संपादन केले होते. करारानुसार कंपनीला प्रत्येक हंगामात बीसीसीआयला सुमारे 440 कोटी रुपये द्यावे लागले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.