IPL 2020 : आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा सनरायजर्स हैदराबादशी सामना

एमपीसी न्यूज – इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये (आयपीएल) आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. भारताचा यशस्वी कर्णधार विराट कोहली अजून ‘आयपीएल’चे विजेतेपद पटकावू शकलेला नाही. यास्थितीत यंदाच्या तेराव्या हंगामातील ‘आयपीएल’मध्ये विजेतेपद पटकावण्याचे लक्ष कोहलीसमोर आहे. यंदाच्या संघात फलंदाजीत ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंचचा झालेला समावेश महत्त्वपूर्ण आहे. फिंच धडाकेबाज सुरुवात बेंगळूरुला करून देईल अशी अपेक्षा आहे.

सनरायजर्स हैदराबादची भिस्त नेहमीप्रमाणे कर्णधार आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरवर आहे. वॉर्नरने तीन वेळा ‘आयपीएल’मध्ये ‘ऑरेंज कॅप’ (हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज) पुरस्कार पटकावला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली हैदराबादने 2016मध्ये ‘आयपीएल’ जिंकली आहे. गोलंदाजीमध्ये हैदराबादकडे भुवनेश्वर कुमार, रशीद खानसारखे अनुभवी गोलंदाज आहेत. जोडीला फिरकीपटू मोहम्मद नाबी चांगल्याप्रकारे लयीत आहे. बेंगळूरुसाठी फिरकीपटू यजुवेंद्र चहलकडून मोठ्या अपेक्षा आहेत. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिसला नुकतेच बेंगळूरुने करारबद्ध केले आहे.

सनरायझर्स हैदराबाद :
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विलियमसन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, वृद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, मिशेल मार्श, अभिषेक शर्मा, बावनका संदीप, संजय यादव, फेबियन एलन, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, टी. नटराजन, बसिल थंपी

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर :
विराट कोहली (कर्णधार), ऍरोन फिंच, देवदत्त पडीकल, पार्थिव पटेल, एबी डिव्हिलियर्स, गुरकीरत सिंग, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, एडम झाम्पा, इसुरू उदाना, मोईन अली, जोश फिलिप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.