IPL 2020 Schedule : रविवारी जाहीर होणार ‘आयपीएल’चे वेळापत्रक

'बीसीसीआय'ने या हंगामाचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर केले नव्हते.

एमपीसी न्यूज – ‘युएई’मध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलचा तेरावा हंगाम पार पडणार आहे. ‘बीसीसीआय’ने या हंगामाचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर केले नव्हते. हे वेळापत्रक उद्या (रविवारी दि.6) जाहीर केले जाणार असल्याची माहिती आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली.

ब्रिजेश पटेल यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलत असताना ही माहिती दिली. 19 सप्टेंबरपासून युएईत आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे.

भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदाची स्पर्धा युएईत आयोजित केली आहे.

काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयने वेळापत्रकाची घोषणा लांबणीवर टाकली होती.

परंतू चेन्नईचे दोन्ही करोनाग्रस्त खेळाडूंचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर आयपीएलच गव्हर्निंग काउन्सिलने रविवारी वेळापत्रक जाहीर करण्याचं ठरवलं आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.