_MPC_DIR_MPU_III

IPL 2020 : धक्कादायक ! चेन्नई सुपर किंग्ज संघातील गोलंदाजासह स्टाफमधील 12 जणांना कोरोना

कोरोनाची लागण झालेले चेन्नईच्या संघातील सर्व सदस्यांची प्रकृती स्थिर असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात हलवलं आहे.

एमपीसी न्यूज – IPLचा तेरावा हंगाम सुरु होण्याआधीच ‘युएई’मधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एक गोलंदाज आणि सपोर्ट स्टाफमधील 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

‘एनडीटीव्ही स्पोर्ट्स’ या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे. कोरोनाची लागण झालेले चेन्नईच्या संघातील सर्व सदस्यांची प्रकृती स्थिर असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात हलवलं आहे.

बीसीसीआयने युएईत दाखल झाल्यानंतर सर्व संघांना मार्गदर्शक तत्व आखून दिली होती. चेन्नईचा संघही या सर्व नियमांचं पालन करत होता. अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीयेत.

_MPC_DIR_MPU_II

दुबईत दाखल झालेल्या चेन्नईच्या खेळाडूंनी नियमाप्रमाणे आपला सहा दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. परंतू, संघातील सदस्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे चेन्नईच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवात केलेली नाही.

राजस्थान, पंजाब यासारख्या संघांनी आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर सरावाला सुरुवात केली आहे. दुबईत दाखल झाल्या-झाल्या सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची करोचा चाचणी करण्यात आली होती.

मात्र, संघातील सपोर्ट स्टाफमधले 12 सदस्य आणि एका खेळाडूला करोनाची लागण झाल्यानंतर चेन्नईच्या संघाने क्वारंटाइन कालावधी आठवडाभरासाठी वाढवला आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.