IPL 2020 : वैयक्तिक कारणासाठी सुरेश रैना भारतात परतला, आयपीएलमधून माघार

चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील एक गोलंदाजाचासह सपोर्ट स्टाफमधील 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.

एमपीसी न्यूज – आयपीएलचा तेरावा हंगाम थोड्या दिवसात सुरू होणार आहे मात्र यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला दोन मोठे झटके बसले आहेत. चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील एक गोलंदाजाचासह सपोर्ट स्टाफमधील 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.

आता धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना देखील वैयक्तिक कारणासाठी भारतात परतला असून तो आयपीएल मध्ये सहभागी होणार नसल्याचे संघाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

आयपीएलचा तेरावा हंगाम खेळण्यासाठी सर्व संघ युएईमध्ये दाखल झाले आहेत.  सहा दिवसांचा क्वारंटाइन कालावधी संपला आहे. मात्र, आयपीएल सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सला जबरदस्त धक्का बसला आहे.

चेन्नई सुपर किंग्सचे कार्यकारी संचालक केएस विश्वनाथन यांनी असे सांगितले की, सुरेश रैना वैयक्तिक कारणामुळे भारतात परतला असून तो या आयपीेल हंगामासाठी उपलब्ध नसेल.

चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील एक गोलंदाजासह सपोर्ट स्टाफमधील 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व संघाचा दुबईतला क्वारंटाइन कालावधी वाढवण्यात आला आहे.

त्यानंतर आता सुरेश रैना आयपीएल साठी उपलब्ध असणार नाही त्यामुळे चेन्नई संघासमोर नवीन संकट उभे राहिले आहे.

सुरेश रैना 2008 पासून प्रत्येक आयपीएल हंगामात आत्तापर्यंत खेळला आहे. हा त्याच्या पहिलाच असा हंगाम असेल ज्यात तो खेळणार नाही.

आता सुरेश राहण्याच्या जागेवर कोणत्या नव्या खेळाडूला चेन्नई सुपर किंग्स संघात संधी देणार याकडे सर्व क्रीडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.