IPL 2020 : अखेर IPLला स्पॅान्सर मिळाला; ड्रिम 11ने 222 कोटींना मिळवलं प्रायोजकत्व

टाटा सन्स, पतंजली, बायजू , अनअकॅडमी हे ब्रँड देखील प्रायोजकत्व मिळवण्याच्या शर्यतीत होते. : The IPL finally got a sponsor; Dream 11 sponsorship Rs 222 crore

एमपीसी न्यूज – आयपीएल 2020 च्या मुख्य प्रायोजकत्वाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून ड्रिम 11 यांनी 222 कोटींना मुख्य प्रायोजकत्व मिळवलं आहे. टाटा सन्स, पतंजली, बायजू , अनअकॅडमी हे ब्रँड देखील प्रायोजकत्व मिळवण्याच्या शर्यतीत होते.

या सर्वांमध्ये अखेर ड्रिम 11 ने बाजी मारली. त्यामुळे आता 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या बहुप्रतिक्षित IPL 2020 ही स्पर्धा Dream 11 IPL 2020 या नावाने रंगणार आहे. आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी याबाबत एनएनआयला माहिती दिली आहे.

आयपीएल स्पॉन्सरशिप मिळवण्यासाठी ऐनवेळी बाबा रामदेव यांच्या पतंजली या ब्रॅण्डने देखील उडी मारली होती. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. तसेच टाटा सन्स सारखे तागडे प्रतिस्पर्धी असताना देखील ड्रीम 11 ने बाजी मारत आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.