IPL 2020 : टाॅम करणचे अर्धशतक व्यर्थ, कोलकात्ताचा 37 धावांनी विजय

एमपीसी न्यूज – आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 12 व्या सामन्यात कोलकाता नाईट राईडर्सने राजस्थान रॉयलवर 37 धावांनी विजय मिळवला आहे. राजस्थानच्या टाॅम करणचे 36 चेंडूत नाबाद 54 धावा केल्या मात्र तो आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन गेला शकला नाही. कोलकत्ताने हंगामातील दुसरा विजय मिळवला आहे.

कोलकत्ता ने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 174 धावा केल्या. कोलकत्ताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयलचा डाव 137 धावांवर आटोपला.

राजस्थान कडून जोस बटलरने चांगली सुरूवात केली मात्र दुसऱ्या षटकात स्टिव्ह स्मिथ अवघ्या तीन धावांवर बाद झाला आणि त्यानंतर संघाला गळती लागली आणि एकापाठोपाठ एक गडी बाद व्हायला लागले.

टाॅम करणने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला त्याने 36 चेंडूत नाबाद 54 धावा केल्या मात्र तो आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन गेला शकला नाही. कोलकत्ता कडून मावी, चक्रवर्ती, नागरकोटी यांनी 2-2-2 गडी बाद केले तर कमिन्स, सुनील नरेन आणि कुलदीप यादव यांनी 1-1-1 गडी बाद केला.

त्याआधी नाणेफेक जिंकून राजस्थानच्या स्टीव्ह स्मिथने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 174 धावा केल्या. कोलकाताचा सलामीवीर सुनील नारायण याने चाहत्यांची निराशा केली. 14 चेंडूत 2 चौकार आणि एका षटकारासह 15 धावा करून तो माघारी परतला.

नितीश राणाने चांगली सुरूवात केली होती, पण तो 17 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. पाठोपाठ आंद्रे रसलही चांगली सुरूवात मिळाल्यावर बाद झाला. 3 षटकारांसह त्याने 24 धावा केल्या. दिनेश कार्तिकही एका धावेवर बाद झाला. पण युवा सलामीवीर शुबमन गिलच्या 47 धावा आणि इयॉन मॉर्गनने शेवटपर्यंत किल्ला लढवत केलेली नाबाद 34 धावांची खेळी यांच्या जोरावर कोलकाताने 170 पार मजल मारली.

राजस्थानकडून आर्चरने 18 धावांत 2 बळी, उनाडकटने 14 धावांत 1 बळी तर राहुल तेवातियाने 6 धावांत 1 बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.