IPL 2020 : ‘VIVO’ नंतर या 3 कंपनीमध्ये स्पॉन्सरशिपसाठी चुरस असल्याची चर्चा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – ‘आयपीएल’ चा विवो कंपनीसोबत करार स्थगित झाल्यानंतर आता बीसीसीआयला तेराव्या हंगामासाठी नव्या स्पॉन्सरचा शोध घ्यावा लागणार आहे. परंतु बीसीसीआयला नवीन स्पॉन्सरबद्दल अजिबात चिंता नसून तीन कंपनीत आयपीएल स्पॉन्सरशिपसाठी चुरस असल्याची माहिती समोर आली आहे.

बीसीसीआय अधिकाऱ्याने एका खेळ विषयक संकेतस्थळांला दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अनेक ब्रँड आणि कंपन्या आयपीएल स्पॉन्सरशीपसाठी प्रयत्न करत आहेत. आम्ही अद्याप याबद्दल निर्णय घेत आहोत, चर्चा सुरु आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत नव्या स्पॉन्सरबद्दलचा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. रिलायन्स जिओ, बायजूस आणि ॲमेझॉन तसेच इतर काही कंपन्यांनी स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआय सोबत चर्चा करायला सुरुवात केली आहे.

भारत आणि चिनी सैनिक यांच्यात लडाख येथील गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. यामध्ये 20 भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं. या घटनेनंतर देशभरात चिनी वस्तूंविरोधात वातावरण निर्माण झालं. बीसीसीआयनेही विवो सोबतचा करार मोडावा यासाठी सोशल मीडियावर दबाव वाढत होता. परंतू गव्हर्निंग काऊन्सिलने पहिल्यांदा विवो कंपनीची स्पॉन्सरशिप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतू यानंतर देशभरात चाहत्यांची नाराजी व इतर जाहीरातदारांची नाराजी यामुळे बीसीसीआयने एक पाऊल मागे येत वर्षभरासाठी विवो सोबतचा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

2018 साली बीसीसीआय आणि विवो कंपनीचा पाच वर्षांचा करार झाला होता. आयपीएल स्पर्धेच्या स्पॉन्सरशिपसाठी विवो ने बीसीसीआयला 2199 कोटी रुपये दिले होते. प्रत्येक हंगामाला विवो कंपनी बीसीसीआयला 440 कोटी रुपये देत होती. दरम्यान, 19 सप्टेंबर पासून युएई मध्ये आयपीएलला सुरुवात होत आहे. आयपीएलला च्या तेराव्या हंगामासाठी बीसीसीआय कोणाला स्पॉन्सरशिप देईल ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.