IPL 2020: आयपीएलचा तेरावा हंगाम कोण जिंकणार ? ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणतो ‘हे’ दोन संघ आहेत प्रबळ दावेदार

IPL 2020: Who will win the 13th season of IPL? The Australian player says ‘these’ are two teams strong contenders हार्दिक पांड्या दुखापतीनंतर प्रथमच स्पर्धेत खेळणार आहे. त्याच्याकडे गोड बातमीदेखील आहे.

एमपीसी न्यूज – अखेर आयपीएलचा मार्ग मोकळा झाला असून आयपीएलचा तेरावा हंगाम 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये खेळवला जाणार आहे. हा हंगाम कोण जिंकणार याबाबत क्रिकेट रसिकांमध्ये उत्सुकता असून ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉग याने दोन संघ विजयाचे प्रबळ दावेदार असतील असा अंदाज वर्तवला आहे.

ब्रॅड हॉग म्हणाला, मला असं वाटतं की दोन संघ या स्पर्धेच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यापैकी एक म्हणजे मुंबई इंडियन्सचा संघ पाचवं विजेतेपद मिळवू शकतो. मुंबईचा संघ संतुलित आहे. त्यांच्याकडे वरच्या फळीत चार तगडे फलंदाज आहेत. तसेच चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत.

गोलंदाजीचा भारही अनुभवी बुमराह आणि मलिंगा यांच्या खांद्यावर आहे. हार्दिक पांड्या दुखापतीनंतर प्रथमच स्पर्धेत खेळणार आहे. त्याच्याकडे गोड बातमीदेखील आहे. त्यामुळे सकारात्मक ऊर्जेने तो खेळेल आणि स्पर्धेचा हिरो ठरेल असं मला वाटतं.

हॉग पुढे म्हणाला, आयपीएल विजेतेपदाचा दुसरा दावेदार म्हणजे बंगळुरूचा संघ. त्यांच्याकडे कायम चांगले खेळाडू असतात पण त्यांच्या फायदा संघाला हवा तसा होत नाही. यावेळी त्यांना चांगली संधी आहे.

फिंचला त्यांच्या संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे पॉवरप्लेमध्ये तो चांगली फटकेबाजी करू शकतो. त्याचा फायदा मधल्या फळीतील विराट आणि डीव्हिलियर्स यांना होईल. गोलंदाजीतही त्यांच्याकडे डेल स्टेन आणि केन रिचर्डसन असे दोन खेळाडू आहेत. त्यामुळे नीट योजना आखून खेळल्यास त्यांना विजेतेपदाची संधी आहे, असे हॉगने सांगितले.

दरम्यान, आयपीएलचा तेरावा हंगाम जरी सुरू होणार असला तरी या स्पर्धेवर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने बीसीसीआय आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डावर सडकून टीका केली आहे.

ट्वेंटी-20 विश्वचषक खड्ड्यात गेला तरी चालेल मात्र, आयपीएल झाले पाहिजे. तसेच, खेळाडूंच्या आर्थिक नुकसानास देखील हे दोन क्रिकेट बोर्ड जबाबदार असल्याचेही तो म्हणाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.