IPL 2021 : मुंबईच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा कायम तरीही मार्ग खडतर

एमपीसी न्यूज – आयपीएलचा सीझन आता समाप्तीकडे चालला आहे. संघामध्ये आता प्ले ऑफ साठी रस्सीखेच सुरू आहे. मुंबई इंडियन्सने मंगळवारी राजस्थान रॉयल्सचा आठ गडी आणि 70 चेंडू राखून पराभव केला. या विजयामुळे मुंबईच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा कायम आहेत, तरीही मुंबईचा मार्ग खडतर असणार आहे.

मुंबईने राजस्थानवर मिळवलेल्या विजयाच्या जोरावर गुणतालिकेत सातवरुन थेट पाचव्या स्थानी उडी मारली आहे. मुंबईच्या या विजयामुळे चौथ्या स्थानावर कोणता संघ राहणार याची चुरस आणखीन वाढली आहे.

…तरच मुंबई प्ले ऑफमध्ये जाईल
– मुंबईने त्यांच्या अंतिम सामन्यात हैदराबादला पराभूत केलं तर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी केकेआरला शेवटचा सामना जिंकावाच लागेल.

– मुंबई सध्या पाचव्या स्थानी आहे. मात्र नेट रनरेटच्या बाबतीत ते केकेआरपेक्षा फारच मागे आहेत. दोन्ही संघांमधील नेट रनरेटचं अंतर फारच जास्त असल्याने त्यांना केकेआरच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागणार आहे.

– एका अंदाजानुसार सध्या केकेआर आणि मुंबईमधील नेट रनरेटचं अंतर भरून काढण्यासाठी मुंबईला हैदराबाद विरुद्ध सामना 11 षटकं शिल्लक असतानाच किंवा 90 हून अधिक धावांच्या फरकाने जिंकावा लागणार आहे.

– अर्थात स्वत:चा शेवटचा सामना जास्तीत जास्त मोठ्या फरकाने जिंकण्यासोबतच त्यांना राजस्थान केकेआरला पराभूत करेल यासाठी देव पाण्यात ठेवावे लागणार आहेत. असं झालं तरच मुंबईला प्लेऑफमध्ये खेळता येईल.

– केकेआरने त्यांचा अंतिम सामना जिंकला तर मुंबई आणि केकेआरचे गुण समान होतील पण नेट रनरेटच्या जोरावर केकेआर प्लेऑफमध्ये जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.