IPL 2021 : आयपीएलची तारीख ठरली, ‘या’ दिवसापासून होणार सुरूवात

एमपीसी न्यूज – नुकताच आयपीएलच्या 14 हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर IPL 2021 नेमकी कधी सुरू होणार? ती कुठे होणार, भारतात की युएईमध्ये? याविषयी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता असताना यंदाच्या आयपीएलच्या तारखा निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे.

आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलमधील एका सदस्याच्या हवाल्याने एएनआयने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार येत्या 9 एप्रिलपासून आयपीएल 2021 चे सामने सुरू होणार आहेत. यासंदर्भातला निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात जीसीची मीटिंग होणार असून त्यामध्ये तारखांवर शिक्कामोर्तब होईल. त्यानुसार 9 एप्रिल रोजी आयपीएल सुरू होणार असून 30 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना होईल.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, तारखांबाबत पाठवण्यात आलेल्या प्रस्तावावर निश्चित माहिती असली, तरी अद्याप आयपीएल स्पर्धेतील सामने कुठे भरवले जावेत? याविषयी काहीही ठरवण्यात आलेले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.