IPL 2021 : ‘आयपीएल’चे उर्वरित सामने ‘या’ तारखेपासून होण्याची शक्यता, ठिकाणही ठरले

एमपीसी न्यूज – भारतात कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरू असताना देखील आयपीएलचे सामने खेळवले जात होते. बायोबबलमध्ये असून देखील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे आयपीएल स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित सामने कधी व कुठे खेळवले जाणार याबाबत उत्सुकता होती. लवकरच आयपीएलचे उर्वरित सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे.

_MPC_DIR_MPU_II

आयपीएलचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यात संयुक्त अरब अमिरात (युएई) खेळवले जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या वतीने 29 मे नंतर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयकडे 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोंबर या कालावधीत आयपीएलचे आयोजन करण्यासाठी 30 दिवसांचा वेळ आहे. मात्र याच कालावधीत डबल हेडर सामन्यांची संख्या वाढवुन बीसीसीआयला सामने संपवावे लागतील.

तीस दिवसांच्या कालावधीत आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते. जर बीसीसीआय आणि ईसीबीत चर्चा झाली नाही. तर बीसीसीआयला 30 दिवसांतच सर्व 31 सामन्यांचे आयोजन करावे लागेल. त्यात चार बाद फेरीचे सामने देखील आहेत. त्यात आठ दिवस डबल हेडर सामने घ्यावे लागतील. म्हणजेच या चार अठवड्यांच्या शेवटच्या दोन दिवसांत 16 सामने होतील. तसेच याच काळात मालिका संपल्यावर भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना युएईत देखील आणावे लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.