IPL News : कोलकाता नाइट रायडर्सचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, आजचा सामना रद्द !

एमपीसी न्यूज : आयपीएलच्या मैदनातून मोठी घडामोड समोर आली आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्थी, संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासोबत आणखी काही खेळाडूंची तब्येत बिघडल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे केकेआरचा संपूर्ण संघ विलगीकरणात गेला असून आयपीएलच्या IPL 2021 आजच्या सामन्याची वेळ बदलण्याची आल्याची माहिती समोर आली आहे. 

आयपीएलमध्ये आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगोलर यांच्यात लढत होणार होती. कोलकोताचा संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफ देखील आता विलगीकरणात गेला असल्यानं आजचा सामान होऊ शकणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, बीसीसीआयकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.