IPL 2022 : प्रेक्षकांच्या अनुपस्थित भारतातच होणार 2022 चे आयपीएल पर्व

एमपीसी न्यूज – 2022 रोजी होणारे आयपीएल पर्व भारतातच होणार आहे. स्पर्धेच्या सामान्यांसाठी प्रेक्षकांच्या उपस्थितीला मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. बीसीसीआयच्या विश्वसनीय सूत्रांनी ‘एएनआय’ला याबाबत माहिती दिली आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने प्रेक्षकांच्या अनुपस्थित 2022 चे आयपीएल पर्व घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, डि वाय पाटील स्टेडियम या ठिकाणी हे सामने खेळवले जातील. तसेच गरज पडल्यास पुण्यात देखील सामने खेळले जाणार असल्याचे बातमीत म्हटले आहे.

 

 

2022 च्या सीझनसाठी खेळाडू नोंदणी 20 जानेवारी रोजी बंद झाली आहे. एकूण 1 हजार 214 खेळाडूंनी करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यात 896 भारतीय आणि 318 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.