IPL 2023 : 2008 नंतर 2023 मध्ये यश मिळवू शकेल राजस्थान रॉयल्स…….

एमपीसी न्यूज – राजस्थान रॉयल्स हा जयपूर, राजस्थान येथे स्थित एक क्रिकेट ( IPL 2023 ) संघ आहे, जो इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतो. राजस्थान रॉयल्स च्या पुरुष संघाने 2008 मधील झालेले सर्वात पहिले इंडियन प्रीमियर लीग जिंकले होते. परंतु तेव्हापासून त्यांची कामगिरी काही एवढी चांगली दिसून आलेली नाही. राजस्थान रॉयल्स कायम स्वतःच्या संघामध्ये नवे व तरुण खेळाडूंना संधी देण्यासाठी जाणले जातात. राजस्थान रॉयल्स चे बऱ्याच क्रिकेट विषयी भ्रष्टाचार व घोटाळ्यांमध्ये त्यांचे नाव आले आहे त्यामुळे 2016 आणि 17 साली त्यांना प्रतिबंधित करण्यात आले होते. जयपूरचे सवाई मानसिंग स्टेडियम हे राजस्थान रॉयल्स चे प्राथमिक मैदान आहे. राजस्थान रॉयल्स हे मागच्या वर्षी अंतिम सामन्यापर्यंत गेले होते परंतु गुजरात टायटन्स यांनी त्यांना हरवले.

 

 

 

श्रीलंका चा माजी क्रिकेटपटू कुमार संगाकारा हा राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक आहे. राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधार पद भारतीय यष्टिरक्षक संजू सॅमसन यांनी घेतले आहे. ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न याने सुरुवातीच्या वर्षांमध्ये रॉयल्स ना चांगले यश मिळवून दिले होते. परंतु त्याचा वारसा पुढे चालवताना अजिंक्य रहाणे आणि शेन वॉटसन हे दोन्ही कर्णधार ( IPL 2023 ) थोडे कमीच पडले. परंतु मागच्याच वर्षी संजू सॅमसन ने राजस्थान रॉयल्सच्या संघाला 2008 नंतर पहिल्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत पोचवले होते. मागच्या वर्षीचा मुख्य संघ त्यांनी एकत्रित घेऊन यावर्षी काही नवीन खेळाडू विकत घेतले आहेत. त्यामध्ये वेस्ट इंडियन अष्टपैलू जेसन होल्डर, ऑस्ट्रेलियन गोलंदाज ॲडम जैम्पा, भारतीय फिरकी गोलंदाज मुरुगन अश्विन इत्यादी घेतले आहेत.

 

 

Chikhali : काळेवाडी, चिखलीतून तीन लाखांचा गुटखा जप्त

 

मागच्या वर्षी सारखेच यावर्षीही राजस्थान रॉयल्स ची फलंदाजी फळी चांगली दिसत आहे. भारतीय तरुण फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि इंग्लंडचा यष्टीरक्षक व फलंदाज जॉस बटलर आणि त्यांच्या मागून येणारा संजू सॅमसन या तिघांमुळे राजस्थानचा टॉप ऑर्डर चांगला वाटतो. त्याच्यावरून शिमरन हेटमायर, जो रूट, देवदत्त पडिक्कल, हे फलंदाज मिडल ऑर्डर मध्ये आहेत. भारतीय फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विन व त्यांच्याबरोबर ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज ॲडम जैम्पा असल्यामुळे राजस्थानची फिरकी गोलंदाजी ही मजबूत दिसत आहे.

 

 

 

भलेही वेस्ट इंडियन अष्टपैलू जेसन होल्डर असला तरीही राजस्थान कडे अजून चांगले अष्टपैलू पर्याय नाहीत. 20 षटकांच्या खेळामध्ये अष्टपैलू खेळाडू हे मोठा बदल घडवून आणू शकतात. आयपीएलच्या इतिहासात सुद्धा आपण द्वेन ब्रावो आणि कायरन पोलार्ड असे चांगले अष्टपैलू बघितले आहेत. रियान परागला झालेल्या दुखापतीमुळे राजस्थान कडे काही अष्टपैलू मध्ये जास्त पर्याय नाहीत. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आणि भारतीय वेगवान गोलंदाज नवदीप सैनी सोडले तर राजस्थान कडे अंतिम षटकांमध्ये बॉलिंग टाकणारा असा एकही ‘डेथ ओवर स्पेशालिस्ट’ नाही आहे. तिथे राजस्थानला भोगावे लागू शकते. परंतु मागच्या वर्षी संजू सॅमसन ने स्वतःला कर्णधार ( IPL 2023 ) पदासाठी सक्षम सिद्ध केले आहे. तर यावर्षीही राजस्थानचा परफॉर्मन्स चांगला असेलच असे गृहीत धरू शकतो.

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.