IPL 2023 : पंजाब किंग्स ची पहिली आयपीएल ट्रॉफी अजून किती लांब?

एमपीसी न्यूज – पंजाब किंग्स हा मोहाली, पंजाब येथे स्थित ( IPL 2023) एक फ्रँचायझी क्रिकेट संघ आहे जो इंडियन प्रीमियर लीग मध्ये खेळतो. हा संघ 2008 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब या नावावर स्थापित झाला होता. 2021 मध्ये या संघाचे नाव पंजाब किंग्स असे ठेवण्यात आले. हा संघ मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीती झिंटा आणि करण पॉल यांच्या संयुक्त मालकीचा आहे. पंजाबी येथील मोहाली मधले पंजाब क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम हे पंजाब किंग्सचे प्राथमिक स्टेडियम आहे. 2014 च्या आयपीएल मध्ये पंजाब किंग्स लीग टेबलवर पहिले आले होते आणि अंतिम सामन्यापर्यंतही पोहोचले होते. पण अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स नेत्यांना एकदम एका रोमांचक सामन्यांमध्ये हरवले होते. त्याच्या व्यतिरिक्त पंजाब किंग्स एकदाच प्लेऑफमध्ये गेलेले आहेत. आयपीएल मध्ये पंजाब किंग्सची कामगिरी एवढी काही चांगली दिसून येत नाही असे म्हटले तरी चालेल.

विश्वचषक विजेते ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस हे पंजाब किंग चे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. ट्रेव्हर बेलिस यांनी 2019 मध्ये इंग्लंड क्रिकेट संघाकडून प्रशिक्षक म्हणून विश्वचषक जिंकला होता. भारताचा तुफानी फलंदाज शिखर धवन हा पंजाब किंग्सचा कर्णधार ( IPL 2023) असणार आहे. शिखर याआधी काही काळासाठी सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार होता.

यंदाच्या लिलावामध्ये पंजाब किंग्स ने इतिहास मोडला. इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रकमेला (18.50 कोटी) विकत घेण्यात आली. पंजाब किंग्स ने यावर्षी सॅम करन, सिकंदर राजा, हरप्रीत भाटिया इत्यादी खेळाडू घेतले आहेत.

 

 

Aadhar Card : पॅनला आधारशी लिंक करण्याचा मुदतीत 30 जूनपर्यंत वाढ

 

पंजाब किंग्स ची फलंदाजी यावर्षी अधिक चांगली दिसत आहे. पंजाबमध्ये धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, सॅम करन आणि डार्सी शॉर्ट यांसारख्या खेळाडूंसह घातक फलंदाजी आहे. मुख्य संघ बदललेला नाही आणि यामुळे गोलंदाजी आवश्यक संतुलन दिसून येत आहे. सॅम करन, कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग नवीन चेंडू आणि तसेच डेथ ओव्हर्ससह गोलंदाजी करू शकतात. पंजाब कडे म्हणून चांगली फलंदाजी आणि चांगली वेगवान गोलंदाजी दिसून येत आहे.

पंजाब किंग्सचे सलामे फलंदाजी ची जोडी काय असेल हे नक्की नाही. इंग्लंडचा सलामी फलंदाज जॉनी बेअरस्टो या आयपीएल मध्ये खेळणार नसल्याने शिखर धवन बरोबर फलंदाजीची सुरुवात कोण करेल हा एक प्रश्नच आहे. त्यावरून एक राहुल चहर सोडला तर एकही चांगला फिरकी गोलंदाजाचा पर्याय दिसून येत नाही. बऱ्याच जणांच्या अजून एक शंका आहे.

मागच्या वर्षी आयपीएल गाजवलेला लियाम लिव्हिंगस्टोन हा गुडघ्याच्या दुखापतीमुळे 1 डिसेंबर 2022 पासून एकही सामना खेळलेला नाही आहे. तो पूर्णपणे बरा झाला असे सुद्धा म्हणता येणार नाही. पंजाब किंग्स चे समर्थक हे लियाम लिव्हिंगस्टोन आयपीएल सुरू होण्याच्या आत दुखापतीतून बाहेर व्हावा अशी अपेक्षा ठेवतील. शिखर धवन पंजाब किंग्स ला चांगले मार्गदर्शन करून स्वतःची भारतीय क्रिकेट संघातली हरवलेली जागा परत मिळवण्याचा प्रयत्न करेलच. तर शिखर धवन पंजाबला आयपीएल जिंकू शकतो का नाही ही ( IPL 2023) वेळच सांगेल.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.