IPL 2023 :आयपीएलचा अंतिम सामना रद्द? जाणून घ्या अंतिम सामन्याबाबत सर्व माहिती

एमपीसी न्यूज – चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2023 चा सामना पावसामुळे रद्द करून राखीव दिवशी म्हणजेच 29 मे 2023, सोमवार रोजी ठेवण्यात आला. मुसळधार पावसामुळे (IPL 2023) खेळाची सुरुवात करण्यात आली नाही आणि खेळपट्टीचा स्तिथी अनुकूल नाही असा निष्कर्ष बांधण्यात आला. आज जरी पाऊस पडण्याची शक्यता नसली, तरीही वातावरणाचा अचूक अंदाज बांधणे अवघडच असते.

40 षटकांचा सामना पूर्ण करण्यावर आयोजकांचे लक्ष केंद्रित असेल, परंतु पावसामुळे खेळाला विलंब झाला तर कमी षटकांचा सुद्धा खेळ होऊ शकतो. पावसामुळे उशीर झाल्यास सामना 9.36 च्या आत सुरु झाला तर 20 षटकांचा पूर्ण सामना बघायला मिळू शकतो. त्यानंतर  12.06 (मंगळवार) षटके कमी होत जातील व 5 षटकांचा सामना होऊ शकतो.

जर 12.06 पर्यंतही सामना चालू झाला नाही तर राखीव दिवशी थोडा वेळ वाढवून सुपर ओव्हर ने अंतिम सामन्याचा निर्णय ठरेल. परंतु पावसाचा वर्षाव थांबलाच नाही तर गुजरात टायटन्स यांची कामगिरी चेन्नई सुपर किंग्स पेक्षा लीग मध्ये चांगली होती. मग त्याप्रमाणे गुजरात टायटन्स हे आयपीएल 2023 चे विजयी मानले जातील आणि चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या क्रमांकावर (IPL 2023) येतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.