IPL 2023 – आरसीबीच्या नशिबी यावर्षी तरी आयपीएल ट्रॉफी आहे का?

एमपीसी न्यूज – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा बेंगळुरू, कर्नाटक येथे स्थित (IPL 2023) एक क्रिकेट संघ आहे जो इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळतो. याची स्थापना 2008 मध्ये युनायटेड स्पिरिट्सने केली होती आणि कंपनीच्या मद्य ब्रँड रॉयल चॅलेंजच्या नावावरून त्याचे नाव देण्यात आले होते. रॉयल चॅलेंजर्सने एकदाही आयपीएल जिंकले नाही, परंतु त्यांनी तीन वेळा उपविजेतेपद पटकावले आहे. आरसीबी संघाचे प्राथमिक मैदान म्हणजे चिन्हस्वामी स्टेडियम, बेंगळुरू हे आहे. या संघाकडे IPL मधील सर्वोच्च धावा(263/5)आणि सर्वात कमी धावा(49) अशा दोन्ही विक्रम आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू चा मुख्य प्रशिक्षक माजी भारतीय अष्टपैलू संजय बांगर आहे. 2022 च्या सुरुवातीला बऱ्याच काळासाठी कर्णधार असणाऱ्या विराट कोहलीने कर्णधार पदाचा राजीनामा दिला. त्याच्यानंतर कर्णधार पदाची जबाबदारी ही सलामी फलंदाज फाफ डुप्लेसेस याने घेतली. इतर कोणत्याही वर्षाप्रमाणे, संघ व्यवस्थापनाने पुन्हा एकदा ‘ऑन पेपर’ संतुलित संघ तयार केला आहे. परंतु, ते यावर्षी आयपीएलचे पारितोषिक मिळवू शकतील का? हा एक प्रश्नच आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आयपीएल 2023 लिलावासाठी सात जागांसह आले होते आणि त्यांनी 7 कोटी रुपये खर्च करून 25 खेळाडूंचा संघ पूर्ण केला. यावर्षी त्यांनी नामवंत खेळाडू घेण्याऐवजी  तरुण आणि अनोळखी खेळाडूंना विकत घेतले आहे. विल जॅक्स, रीस टॉपली, अविनाश सिंग इ.

2008 मध्ये आयपीएलच्या सुरुवातीपासून आरसीबी संघामध्ये कायम नामवंत आणि तुफान फलंदाजी करणारे खेळाडू आहेत. त्याचप्रमाणे यावर्षीही आरसीबीची फलंदाजी उत्कृष्ट दिसत आहे. चांगल्या फॉर्ममध्ये असणारा (IPL 2023) विराट कोहली, फाफ डुप्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार व शेवटच्या षटकांमध्ये तुफानी फलंदाजी करणारा दिनेश कार्तिक असल्यामुळे आरसीबीची फलंदाजी भरपूर सक्षम दिसत आहे.

याचबरोबर ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, शहबाज अहमद सारखे चांगले अष्टपैलू असल्यामुळे कर्णधार फाफ डुप्लेसेस याला जास्त डोकेदुखी नाही आहे.

Chakan : जागेवर ताबा घेण्यासाठी आलेल्या जमावाकडून दोघांना मारहाण

आरसीबीकडे या वर्षी युजवेंद्र चहल नसल्याने त्यांची फिरकी गोलंदाजी फारच दुर्मिळ दिसत आहे. वानिंदू हसरंगा सोडला तर आरसीबीकडे चांगले फिरकी गोलंदाजीचे पर्याय नाहीत. हसरंगाला दुखापत वगैरे झाली किंवा काही कारणाने तो खेळू शकला नाही, तर आरसीबीकडे त्याचा चांगला बॅकअप असा दिसून येत नाही.

अजून एक चिंतेचा मुद्दा म्हणजे भलेही आरसीबीकडे विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक हे खेळाडू असले तरीही गेल्या काही वेळेत मोठ्या सामन्यांमध्ये हे खेळाडू काही चालले नाहीत. म्हणून आरसीबीकडे असा ‘ मॅच विनर’ असा कोणीही दिसून येत नाही. पण तरीही ज्या संघामध्ये विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल सारखे खेळाडू असतात, त्या संघाच्या स्पर्धा जिंकण्याच्या क्षमतेवर प्रश्न उठवू शकत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.